Pune News, 13 Nov : इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) मोठा वाद निर्माण झाला आहे. उमेदवार निवडीत मतभेदांमुळे पक्षात तणाव वाढला आहे. माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नांना जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या समर्थकांनी कडाडून विरोध केला आहे.
या विरोधामुळे इंदापूरमधील राष्ट्रवादीत स्पष्टपणे दोन गटांत विभागली गेली आहे. पक्षाने आमच्यावर अन्याय केला तर आम्ही शांत बसणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रदीप गारटकर यांनी पक्ष नेतृत्वाला दिला आहे. ते म्हणाले, नेतृत्वाने आमचे मत दुर्लक्षित केले तर स्वतंत्र आघाडी उभी करून निवडणूक लढवू.
बुधवारी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत या वादावर बैठक झाली. त्यानंतर संध्याकाळी इंदापूरमध्ये गारटकर यांच्या घरी कार्यकर्त्यांची बैठक झाली, जिथे त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.
बैठकीत गारटकर म्हणाले, पक्षाने आमच्या भावना मान्य केल्या आणि सन्मान दिला तर आम्ही अजित पवारांसोबतच राहू. अन्यथा राजीनामा देऊन स्वतंत्र उमेदवारी करू. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (१७ तारखेपर्यंत) प्रतीक्षा करू, पण अन्याय सहन करणार नाही.
आपली ताकद आणि समर्थकांची साथ मिळाली तर शहरात एकतर्फी निवडणूक होईल. सर्वांच्या मतांचा आदर करून सन्मानाने एकत्रित पॅनल उभे करू. पक्षाला प्राधान्य आहे, हे मी नेतृत्वाला सांगितले आहे. पक्षाने आमचे ऐकले आणि सन्मान दिला तर घड्याळ चिन्हावरच राहू. पण पक्षाने आम्हाला कोलले तर आम्हीही पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही.
नैतिकता म्हणून, पक्षाविरोधात उभा राहिल्यास राजीनामा देईन, असेही गारटकर यांनी स्पष्ट केले. इंदापूरच्या राजकारणात या घडामोडींमुळे वातावरण तापले आहे. जिल्हाध्यक्ष गारटकर गटाचा थेट इशारा अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतो. पुढील दिवसांत वादाची दिशा आणि निवडणुकीवर होणारा परिणाम याकडे लक्ष लागले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.