Indapur News, 24 May : इंदापुरात दिवसाढवळ्या तहसीलदार यांच्यावर हल्ला करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरातील प्रशासकीय इमारतीकडे जानाता संविधान चौक येथे तहसीलदार श्रीकांत पाटील (Shrikant Patil) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चटणीची पूड टाकू, लोखंडी रॉड आणि गजाने हल्ला केला. या हल्ल्यात तहसीलदार श्रीकांत पाटील आणि त्यांचे चालक बचावले आहेत. मात्र, शासकीय वाहनाचे मोठे नुकसान झालं आहे.
तहसीलदार श्रीकांत पाटील हे शहरातील जुन्या पुणे-सोलापूर मार्गावरून सकाळी 11 वाजता शासकीय वाहनातून ( क्र. MH 42 AX 1661 ) कार्यालयाकडे जात होते. तेव्हा, संविधान चौक येथे विना नंबर असलेल्या चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी चालक अखरे यांच्या अंगावर चटणीची पूड टाकून लोखंडी रॉडने वाहनावर हल्ला केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या हल्ल्यात श्रीकांत पाटील आणि त्यांचे चालक सुदैवाने बचावले आहेत. अज्ञातांनी तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हल्ला केला आहे. त्यामुळे इंदापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
गृहमंत्री महोदय आता तरी जागे व्हा...
या हल्ल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली.
विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही."
"शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे. तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपूर्ण घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामिनावर सुटतात," असं म्हणत सुप्रिया सुळेंनी निषेध नोंदवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.