Mahapalika Election: गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी बनला 'नगरसेवक'; 'या' महापालिकेतून विजयी, जल्लोषही केला

Jalna Mahapalika Election: याची मोठ्या प्रमाणावर टीका होत असून विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याला न्यायव्यवस्थेची थट्टा असल्याचं म्हटलं आहे.
Gauri Lankesh_Shrikant Pangarkar
Gauri Lankesh_Shrikant Pangarkar
Published on
Updated on

Jalna Mahapalika Election: जालना महानगरपालिकत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानं पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अपक्ष म्हणून पांगारकर निवडून आले आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या समर्थकांसह त्यांनी जल्लेषही केला. याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. याची मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. विरोधी पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी याला न्यायिक प्रक्रियेची थट्टा असल्याचं म्हटलं आहे. दहशतवाद विरोधी पथकानं पांगारकर यांना अटक केली होती. राज्यात विविध ठिकाणी स्फोट घडवून आणण्याच्या योजनेला पैसा आणि साहित्य पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Gauri Lankesh_Shrikant Pangarkar
MIM Nagpur: RSS च्या बालेकिल्ल्यात MIM ची मुसंडी! नागपूरमध्ये तब्बल 'इतके' नगरसेवक विजयी

दरम्यान, श्रीकांत पांगारकर हे जालन्याचे रहिवासी असून कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी त्यांचं नाव जोडलेलं आहे. २०१८ मध्ये महाराष्ट्र एटीएसनं बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि हत्यारं जप्त केल्या प्रकरणात पांगारकर यांना अटक केली होती. त्यांच्यावर आर्म अॅक्ट अंतर्गत स्फोटकं आणि युएपीए सारख्या गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, पांगारकर यांच्यावर त्या लोकांच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे ज्यांनी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यामुळेच गौरी लंकेश हत्याकांड प्रकरणातील चार्जशीटमध्ये श्रीकांत पांगारकर यांचं नाव आलं.

Gauri Lankesh_Shrikant Pangarkar
Imtiaz Jalil: आता शिवसेना आमच्या मागे! भाजपची खेळी यशस्वी; संभाजीनगरमधील मोठ्या यशानंतर इम्तियाज स्पष्टच बोलले

४ सप्टेंबर २०२४ रोजी कर्नाटक हायकोर्टानं श्रीकांत पांगारकर यांना लंकेश हत्या प्रकरणात जामीन मंजूर केला. जामीन देताना हायकोर्टानं हे स्पष्ट केलं की जामीन झाला म्हणजे आरोपी दोषमुक्त झालेला नाही. पण जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सार्वजनिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग वाढला. यानंतर पांगारकर यांनी राजकारणात एन्ट्री केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते शिवसेनेत दाखल झाले. पण याला मोठा विरोध झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांचा प्रवेश थांबवला. यानंतर पांगारकर यांनी जालना महापालिकेत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आणि नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. पण यामुळं आता गंभीर गुन्हे दाखल असताना संबंधित व्यक्ती संविधानिक पदावर कार्यरत होणार असल्यानं ही व्यवस्थेतील गंभीर तृटी असल्याचं मानलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com