Shiv Sena Leader Threat: शिवसेनेच्या उपमहापौरांना संपवण्यासाठी 5 लाखाची सुपारी? व्हिडीओ कॉलवर जीवे मारण्याची धमकी

Shiv Sena Leader Rajendra Janjal Death Threat: छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर आणि शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना व्हिडीओ कॉलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. १० लाख रुपयांची खंडणी न दिल्यास जीवे मारू, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
Shiv Sena Leader Rajendra Janjal Death Threat
Shiv Sena Leader Rajendra Janjal Death ThreatSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chhatrapati Sambhajinagar News: उपमहापौर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना व्हिडीओ कॉलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. १० लाख रुपयांची खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. जंजाळ यांना मारण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी घेतल्याचा दावाही धमकी देणाऱ्या व्यक्तीने केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

शुक्रवारी रात्री जंजाळ यांच्या मोबाईलवर हा धमकीचा व्हिडीओ कॉल आल्याचे समजते. या प्रकारानंतर त्यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे तक्रार करून संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांकडून कारवाईची प्रक्रिया सुरू झाली.

पोलीस ठाण्यात ठिय्या

या घटनेनंतर राजेंद्र जंजाळ यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मध्यरात्री उशिरापर्यंत पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात उपस्थित होते. धमकी देणाऱ्या व्यक्तीला तातडीने अटक करावी, अशी त्यांची मागणी होती. संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Shiv Sena Leader Rajendra Janjal Death Threat
Pune Diwali Holiday 2026: पुणे जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्टीत बदल! नवा आदेश; कोणत्या कार्यालयांना लागू होणार, आता 9 नोव्हेंबरला सुटी

पोलिसांच्या भूमिकेवर जंजाळ यांचे प्रश्न

या प्रकरणावरून राजेंद्र जंजाळ यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, धमकीच्या प्रकरणात पुरावा नसल्याचे कारण देत सुरुवातीला गुन्हा दाखल करण्याबाबत असमर्थता दर्शवण्यात आली होती. या भूमिकेमुळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. गुन्हा दाखल झाल्याशिवाय पोलीस ठाण्यातून बाहेर पडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगण्यात आले.

Shiv Sena Leader Rajendra Janjal Death Threat
Deworming Day 2026: शिक्षकांनो, दिवाळी सुटीपूर्वी ही मोहीम राबवा! शाळा, मदरशांना शिक्षण विभागाच्या महत्त्वाच्या सूचना

धमकीच्या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू

उपमहापौरांसारख्या लोकप्रतिनिधीला खंडणीसाठी धमकी मिळाल्याचा आरोप झाल्याने या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख, व्हिडीओ कॉलमागील नेमका उद्देश आणि पाच लाखांच्या सुपारीबाबत करण्यात आलेल्या दाव्याची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, या प्रकरणातील पुढील कारवाईकडे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com