Pawar Family Politics : आत्याच्या विरोधात आता धाकटा भाचाही उतरला राजकीय आखाड्यात

Baramati Lok Sabha Constituency Pawar Family Politics : बारामती लोकसभा मतदारसंघात रंगणार पवार विरुद्ध पवार राजकारण. आत्या सुप्रिया सुळेंविरोधात आता धाकटा भाचाही राजकारणाच्या मैदानात उतरला आहे.
Jay Pawar News
Jay Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Jay Pawar Pune News :

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा संघर्ष रंगणार असल्याच्या सध्याच्या चित्रावरून स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार सुप्रिया सुळे या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात असतील असे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी थेट आत्या म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने Baramati मधील वातावरण काहीसे तापल्याचे पाहायला मिळत आहे. बारामतीत आपल्याला कुटुंबात एकटे पडले जात असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. त्यानंतर अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र श्रीनिवास पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. पवार साहेबांच्या सूचनेनुसार काम करणार असल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले होते.

Jay Pawar News
Lok Sabha Election 2024 : कोणावर होणार उमेदवारीची 'कृपा'? सिंह पुण्यात; इच्छुकांमध्ये धाकधूक

दरम्यान, सध्या अजित पवार यांचे संपूर्ण कुटुंब बारामतीच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात मॅरेथॉन बैठका आणि दौरे करत आहेत. आज जय पवार यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सत्कार आणि अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. इतकेच नाही तर महायुतीचे घटक पक्ष असणारे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही स्वतः उपस्थित राहून जय पवार यांना शुभेच्छा दिल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हा कार्यक्रम सुरू असताना जय पवार यांनी भेटीगाठी दरम्यान 'आधी बारामतीचे उरकून घेतो मग पुण्यातच आहे' असे म्हणत बारामतीनंतर आता पुण्यात अॅक्टिव्ह राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. फक्त बारामतीच नाही तर जय पवार यांनी आता पुण्यात देखील लक्ष घालायला सुरुवात केली आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणले, जय पवार हे फक्त पुणे किंवा बारामती पुरते मर्यादित नेते नसून ते महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आहे. ते आपल्या वाढदिवसाचा कार्यक्रम राज्यात कुठेही घेऊ शकत होते. मात्र त्यांचे पुण्यावर विशेष प्रेम असल्याने त्यांनी पुण्यात हा कार्यक्रम घेतला आहे.

Jay Pawar News
BJP Pune: विरोधकांची अनामत रक्कम जप्त करा; उपमुख्यमंत्र्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com