Sunetra Pawar Emotional Video : सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू, जय पवारांची भावूक पोस्ट; म्हणाले, 'Mom, आम्हा सर्वांना...'

Jay Pawar Sunetra Pawar : शनिवारी जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीदरम्यान संवाद साधताना सुनेत्रा पवार यांचे अश्रू अनावर झाले होते.
Jay Pawar Sunetra Pawar
Jay Pawar Sunetra Pawar sarkarnama
Published on
Updated on

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी आपल्या आई उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा एक भावनिक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यांत अजित पवार यांच्या आठवणींमुळे अश्रू भरलेले दिसत आहेत आणि त्या खूपच भावुक झालेल्या दिसत आहेत.

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. तसेच पुणे आणि बीड या जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

शनिवारी जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीदरम्यान संवाद साधताना सुनेत्रा पवार यांचे अश्रू अनावर झाले होते. त्यांनी त्वरित डोळे पुसून स्वतःला सावरले आणि काम सुरू ठेवले.

हा हृदयस्पर्शी क्षण जय पवार यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे, "Dad नेहमीच आपल्या हृदयात आहेत आणि Mom, आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे."

यापूर्वीही जय पवार यांनी अजित पवार यांच्यासोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. एका स्टोरीत त्यांनी "डॅड, तुमच्या आठवणी नेहमीच जपून ठेवेन. मिस यू डॅड" असे भावनिक शब्द लिहिले होते.

Jay Pawar Sunetra Pawar
Tipu Sultan Controversy : टिपू सुलतान प्रतिमेचा वाद; तिकडे मुख्यमंत्री-सपकाळ भिडले अन् इकडे प्रतिमा काढली!

महाराष्ट्राच्या माऊली...

जय पवार यांनी शेर केलेल्या पोस्टला काहीच तासांत हजारो कमेंट्स आल्या आहेत. कार्यकर्त्यांनी भावनांचा महापूर आणला आहे. एका कार्यकर्त्याने लिहिले, "स्वतःचे दुःख गिळून उभ्या महाराष्ट्रासाठी लढणारी आमची माऊली" – सुनेत्रा पवार यांना 'महाराष्ट्राची माऊली' म्हणत त्यांच्या धैर्याचे कौतुक केले.

दुसऱ्या एका समर्थकाने म्हटले, "आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना इतकं दुःख होतंय, तर ताईंचं दुःख शब्दात मांडणं कठीण आहे, आम्ही निशब्द आहोत." अशा अनेक संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करणाऱ्या कमेंट्समुळे या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Jay Pawar Sunetra Pawar
Mahayuti Government : अर्थमंत्रिपदाबाबत मोठी अपडेट, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडेच तिजोरीच्या चाव्या, मुख्यमंत्री फडणवीस घेणार निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com