Mahayuti Government : अर्थमंत्रिपदाबाबत मोठी अपडेट, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडेच तिजोरीच्या चाव्या, मुख्यमंत्री फडणवीस घेणार निर्णय

Sunetra Pawar Finance Minister Devendra Fadnavis : अर्थमंत्रीपद हे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र, अर्थसंकल्पानंतर त्याबाबत मोठा निर्णय होणार असल्याची चर्चा आहे.
Sunetra Pawar
Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क आणि क्रीडा मंत्रीपदाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवला मात्र अजितदादांकडे असणारे अर्थमंत्रीपद आपल्याकडे ठेवले. यंदा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडणार आहेत. त्यामुळे हे पद राष्ट्रवादीला मिळणारी की नाही याची चर्चा सुरू होती.

'साम टिव्ही'ने दिलेल्या सुत्रांच्या हवाल्यानुसार दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, अर्थमंत्रीपद हे पुन्हा राष्ट्रवादीलाच मिळणार असून सुनेत्रा पवार या अर्थमंत्री होणार आहेत. अजितदादांच्या निधनामुळे अर्थसंकल्पाचे राहिलेले अर्थवट काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केले आणि ते अर्थसंकल्प मांडणार आहेत. मात्र, अर्थसंकल्पाच्यानंतर पुढील दोन तीन महिन्यात अर्थमंत्रीपद हे सुनेत्रा पवार यांना देण्यात येईल.

छगन भुजबळ म्हणाले, अजितदादांनी बजेटचे अर्धवट काम केले आहे बजेटचे महत्त्वाचे बजेट काम आहे मी स्वतः करतो असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या बजेटनंतर आपण अर्थमंत्रिपदाबाबत बसून निर्णय घेऊ असे देखील सांगितले.

Sunetra Pawar
Ganesh Naik : शिंदे पुत्राचं राजकीय भविष्य धोक्यात? गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रावर ‘वार’; ‘नावासमोर कायमचं माजी खासदार करीन!’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले होती की, 'अर्थसंकल्प म्हणजे केवळ एक भाषण वाचायचे नसते. त्यासाठी सिरीज ऑफ बैठका घ्याव्या लागतात. ताई या ठिकाणी आत्ताच उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्या दुःखातून बाहेर आलेल्या नाहीत त्यामुळे त्या लगेच पूर्ण क्षमतेने काम करायला लागतील, अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे.'

विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेणार

सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणाऱ्या या पहिल्याच महिला नेत्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे असणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा होत असताना अजित पवारांच्या निधनाने या चर्चेला ब्रेक लागला आहे. मात्र, विलीनीकरणाबाबत निर्णय या सुनेत्रा पवार याच घेतली, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Sunetra Pawar
Manoj Jarange Patil : 'शिवाजी महाराजांची बरोबरी...'; हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com