Tipu Sultan Controversy : टिपू सुलतान प्रतिमेचा वाद; तिकडे मुख्यमंत्री-सपकाळ भिडले अन् इकडे प्रतिमा काढली!

Malegaon Political Controversy : मालेगावच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतानची प्रतिमा लावण्यात आली होती. हा प्रकार लक्षात आल्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला होता. या विरोधात त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली.
Harshwardhan Sapkal, Devendra Fadnavis
The Tipu Sultan portrait displayed in Malegaon’s municipal office sparked a political controversy, leading to protests and its eventual removal by authorities.Sarkarnama
Published on
Updated on

Malegaon News, 15 Feb : मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांच्या कार्यालयात टिपू सुलतानची प्रतिमा लावण्यात आली होती. त्यावरून राज्यभर वाद निर्माण झाला होता. विशेषत: काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.

मालेगावच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतानची प्रतिमा लावण्यात आली होती. हा प्रकार लक्षात आल्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला होता. या विरोधात त्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली.

हा विषय माध्यमांतून चर्चेत येतात दोन गट पडले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच टिपू सुलतान देखील समकालीन योद्धा होता, असा दावा केला होता. त्यांनी टिपू सुलतानच्या प्रतिमेचे समर्थन केल्याने भाजप चांगलीच संतापली.

Harshwardhan Sapkal, Devendra Fadnavis
Manoj Jarange Patil : 'शिवाजी महाराजांची बरोबरी...'; हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांचा चांगलाच समाचार घेतला होता. सपकाळ यांचे वक्तव्य म्हणजे वैचारिक दिवाळखोरी असल्याचे म्हटले होते. यानिमित्ताने भाजपला एक नवा मुद्दा मिळाला. भाजपच्या विविध नेत्यांनी टिपू सुलतानची प्रतिमा लावल्याबद्दल निषेध केला होता. स्थानिक नेत्यांनीही याबाबत टीका केली होती.

विशेषत: शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याने मालेगावचे वातावरण तापले होते. या पार्श्वभूमीवर इस्लाम पक्षाचे माजी आमदार आसिफ शेख आणि अन्य नेत्यांची महापालिकेत बैठक झाली. त्यात कोणताही वाद किंवा राजकारण होऊ नये, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीत टिपू सुलतानची प्रतिमा काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.

Harshwardhan Sapkal, Devendra Fadnavis
Mahayuti Government : अर्थमंत्रिपदाबाबत मोठी अपडेट, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडेच तिजोरीच्या चाव्या, मुख्यमंत्री फडणवीस घेणार निर्णय

या निर्णयानंतर नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी टिपू सुलतानची प्रतिमा काढून टाकली. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये महापुरुषांची यादी निश्चित करण्यात आली आहे. या यादीमध्ये टिपू सुलतानचे नाव नाही. हा आधार घेत प्रशासनाने कारवाई केली.

राज्यात मालेगावच्या महापालिकेत टिपू सुलतानची प्रतिमा लावल्याने वाद पेटला होता. काँग्रेस आणि भाजप या विषयावर एकमेकांवर तुटून पडले होते. हा राज्यभर वादाचा विषय ठरत असतानाच महापालिकेत मात्र वादाचे कारण असलेली ही प्रतिमाच काढून टाकण्यात आली. त्यामुळे राजकारण आणि आरोप प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांचीही कोंडी झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com