Yugendra Pawar : 'दुसऱ्यांना अनेक संधी दिल्या पण मला फक्त एक...', युगेंद्र पवारांचे सांगता सभेत बारामतीकरांना आवाहन

Maharashtra Assembly Election NCP Sharad Pawar : पवारसाहेबांनी लोकांची कामं केली त्यामुळे लोक त्यांच्या मागे उभे आहेत. महाराष्ट्रात नाही तर बारामतीतही तुतारी वाजणार, असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला.
Yugendra Pawar
Yugendra Pawarsarkarnama
Published on
Updated on

Yugendra Pawar News : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बारामतीमध्ये लेंडीपट्टा मैदानात युगेंद्र पवार यांची सांगता सभा झाली. या सभेत अजित पवार यांचे नाव न घेता युगेंद्र पवार म्हणाले 'तुम्ही दुसऱ्यांना अनेकदा संधी दिली. पण मला एक संधी देऊन बघा आत्तापेक्षा जास्त चांगल काम करून दाखवतो.शाश्वत विकास करून दाखवतो.'

'दुसऱ्यांना अनेकदा संधी दिल्या तरी आपली अनेक काम अडकली आहेत. तिच तिच कामं अडखली आहेत.मला संधी द्या सर्वसामान्य लोकांची कामं करून दाखवतो. तुम्हाला माहिती आहे आत्ता कुणाची कामं होतात ती', असे टोलाही युगेंद्र पवार यांनी लगावला.

पवारसाहेबांनी लोकांची कामं केली त्यामुळे लोक त्यांच्या मागे उभे आहेत.महाराष्ट्रात नाही तर बारामतीतही तुतारी वाजणार, असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला.

Yugendra Pawar
Raj Thackeray : गद्दार, सासू..! शेवटच्या सभेत राज ठाकरे कडाडले, उद्धव ठाकरेंचं सगळंच काढलं...

...तर तुमचं मत भाजपला

बारामतीमध्ये आपण कधीच महायुतीला येऊन दिलं नाही. भाजपला आपण स्वीकारलं नाही. जे आपल्याला सोडून गेले त्यांच्या पेक्षा जास्त आमदार भाजपचे आहेत. हा तालुका पुरोगामी विचार जपणार आहे. आपण कधीच भाजपला मत दिलं नाही. जर तुम्ही त्यांना मत देताय म्हणजे तुम्ही भाजपला मत देताय हे आपण लक्ष्यात ठेवलंय पाहिजे, असे देखील युगेंद्र पवार यांनी सांगितले.

पाणीप्रश्न सोडवणार

बारामतीचा शाश्वात विकास करत असताना आपण पाण्यावर काम करणार आहोत. जनाई-शिरसाई योजना पवारसाहेबांनी आणली. तिचे 20 टक्के काम शिल्लक आहे. पाणी आणल्याशिवाय मी शांत राहणार नाही. इंदापूर दौंड यांचं पाणी नकोय. पण हक्काचे पाणी आणल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द युगेंद्र पवारांनी दिला. तसेच पवारसाहेबांनी जसं पुण्यातील हिंजवडीमध्ये आयटी पार्क काढले. तसे बारामतीमध्ये पहिलं आयटी पार्क आपण बांधून दाखवणार आहे, असे देखील युगेंद्र पवार म्हणाले.

Yugendra Pawar
Ajit Pawar : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांची बारामतीकरांना भावनिक साद; म्हणाले, 'हा दिवस माझ्यासाठी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com