Jitendra Awhad Controversy : जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीतही एकाकी?

Statement About Shri Ram : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये रामावरून जुंपली आहे.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : श्रीरामाबद्दल केलेल्या वक्त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपकडून हल्लाबोल होत असताना त्यांच्या पक्षातही ते एकटे पडल्याचे दिसून येत आहे. खासदार सुप्रिया सुळे, अनिल देशमुख यांनी त्यांच्या विधानावर बोलणे टाळले, तर राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी आव्हाडांना जपून बोलण्याचा सल्ला दिला. पण, आव्हाडांनी रोहित पवार यांच्यावरच पलटवार केला आहे. (Jitendra Awhad became alone in NCP due to his statement about Ram)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीतील शिबिरात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी राम हा मांसाहारी होता, असे विधान केले आहे. त्यावरून राज्यात राजकीय वादंग उठले आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून आव्हाड यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला जात आहे. विरोधकांकडून होत असलेल्या हल्ल्यात राष्ट्रवादीचा एकही नेता आव्हाडांच्या बचावासाठी पुढे आलेला नाही. त्यासंदर्भात पत्रकारांनी छेडले असता त्यांनी काहीसे चिडत ‘कुठलाही प्रश्न मी एकटा लढतो,’ असे उत्तर दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jitendra Awhad
Jitendra Awhad on Lord Ram : राम मांसाहारी असल्याबाबत माझ्याकडे पुरावे; आव्हाडांनी दिला रामायणाचा दाखला..

आव्हाड यांनी केलेल्या विधानाबद्दल खासदार सुप्रिया सुळे, आमदार अनिल देशमुख या पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया देणेही टाळले आहे. तर महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर याबाबतचा प्रश्न आल्यानंतर पत्रकार परिषदेतून उठून जाणे पसंत केले. त्यामुळे श्रीरामाच्या संदर्भात केलेल्या विधानावरून राष्ट्रवादीचा एकही नेता आव्हाड यांना पाठराखण करताना दिसून आलेला नाही. पाठराखण तर सोडाच पक्षातील काही नेत्यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

आमदार रोहित पवार यांनी ‘नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे. देव धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सर्वांनीच ठेवलं पाहिजे, असा सल्ला दिला. त्यावर आव्हाडांनी रोहित पवारांच्या विधानाला मी जास्त महत्व देत नाहीत. ते अजून लहान आहेत, त्यांची आमदारकीची पहिलीच टर्म आहे. आबूधाबीमध्ये जाऊन बोलणं सोपं असतं, असे सुनावले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन नेत्यांमध्ये रामावरून जुंपली आहे.

Jitendra Awhad
Jitendra Awhad Controversy : ‘देवाची निंदा’ कायदा करण्याची मागणी; आव्हाडांविरुद्ध नाशिकमध्ये साधू, महंत आक्रमक

दुसरीकडे, माजी मंत्री राजेश टोपेही यांनीही सबुरीने बोलण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे महाविकास आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही एकाकी पडल्याचे दिसून येते. यापूर्वीही आव्हाड यांनी घेतलेल्या भूमिकांबाबत पक्षाने हात झटकले आहेत. विधानसभेतही त्यांनी मांडलेल्या भूमिकेला अनेकदा पक्षाकडून समर्थन मिळालेले नाही.

दरम्यान, मी कुठलाही प्रश्न एकटा लढतो. लढाई करताना माझ्याबरोबर किती जण आहेत, याचा विचार करून उतरला तर आयुष्यात तुम्ही लढाई करू शकत नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविरोधात मी एकटाच लढलो होतो, असेही जितेंद्र आव्हाड यांनी पक्षातील एकाकीपणावर स्पष्टीकरण दिले.

Edited By : Vijay Dudhale

Jitendra Awhad
Jitendra Awhad : आव्हाडांसाठी मुघल अन् अफझलखान हेच देव; श्रीराम कोण होते, ते त्यांना ज्ञात नसावे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com