

Pune News: बीड जिल्ह्यातील केजचे तरुण तहसिलदार राकेश गिड्डे यांच्या अकाली निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. पण त्यांचा मृत्यू केवळ एक अपघात की घातपात होता? यावर गेले काही दिवस जोरदार चर्चा सुरू होती. अशातच आता पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. जुन्नरचे नायब तहसिलदार अनंता बनाजी गवारी (52) यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. मात्र,गवारी यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा हा अपघात आहे की घातपात अशी शंका उपस्थित केली जात आहे.
नायब तहसिलदार अनंता बनाजी गवारी यांचा शनिवारी (ता.25) बनकर फाटा–जुन्नर मार्गावर भीषण अपघात घडला. या अपघातात हायवा आणि नायब तहसिलदार यांच्या होंडा सिटी कार कारची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात जुन्नरचे नायब तहसीलदार गवारी हे गंभीर जखमी झाले. पुढील उपचारासाठी त्यांना पुण्याला आणत असतानाच त्यांचं निधन झालं.
या अपघातात नायब तहसिलदारांसोबत असलेले महसूल कर्मचारी विजय खर्तोडे हे गंभीर तर, तुषार कोरडे हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात अद्याप पोलिसांचा तपास सुरू केला आहे. पण कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.
नायब तहसिलदार अनंता गवारी हे त्यांच्या सहकाऱ्यांसह होंडा सिटी कारमधून जुन्नरकडे निघाले होते. पण हायवाची जो पांगरीमाथ्याकडून आला होता,त्याची गणपती फाट्याजवळील एस कॉर्नरवर गवारी यांच्या होंडा सिटी कारला समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात गवारी यांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच या अपघातानंतर हा अपघात आहे की घातपात? याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात कार्यरत असलेले तरुण आणि कर्तव्यदक्ष तहसीलदार राकेश गिड्डे यांचे 9 एप्रिलला लातूर-अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. रेणापूर फाट्याजवळ सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. या अपघातावेळी गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते.
रेणापूर फाट्याजवळ पोहोचताच त्यांच्या कारवरील नियंत्रण अचानक सुटले. त्यामुळे गाडी वेगाने रस्त्यावरून घसरत पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, वाहनाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. कारमध्ये ते एकटेच असल्याची माहिती समोर आली आहे. गाडी पलटी झाल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. तहसिलदार राकेश गिड्डे यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त होत असून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.