Vallabh Benke Passed Away : माजी आमदार वल्लभ बेनकेंचे निधन; अतुल बेनकेंना पितृशोक

Junnar MLA Atul Benke News : वल्लभ बेनके ज्येष्ठ नेते शरद पवारांचे विश्वासू सहकारी होते.
Vallabh Benke
Vallabh BenkeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांचे वडील माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते आजारपणामुळे राजकारणात सक्रिय नव्हते. बेनके यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

Vallabh Benke
Bihar Politics : फ्लोअर टेस्टपूर्वी नितीशकुमारांचं टेन्शन वाढलं, 3 आमदार गायब; गडबड होणार?

वल्लभ बेनके (Vallabh Benke) यांचा जन्म 23 जून 1950 रोजी हिवरे बुद्रुक या गावात झाला. ते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. त्यांना सहा वेळा विधानसभेचे तिकीट मिळाले होते, तर त्यांनी 1985 ते 2009 या कालावधीत त्यांनी आमदार म्हणून जुन्नरची सेवा करत तालुक्याचा विकास केला. धरणग्रस्तांसाठी त्यांनी दीर्घ लढा दिलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मूळ शेतकरी असलेले माजी आमदार वल्लभ बेनके यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठा अभ्यास होता. राजकीय वर्तुळात त्यांची शेतकऱ्यांप्रती जिव्हाळा, कुशल संघटक, अभ्यासू नेता म्हणूनच ओळख होती. त्यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. कांदळी एमआयडीसीची स्थापना केली. त्यांनी लेण्याद्री आणि ओझर देवस्थानच्या परिसराचा विकास केला. नारायणगाव (Narayangaon) येथील टोमॅटोचे खरेदी विक्री बाजार केंद्र सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यासह त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

R

Vallabh Benke
Eknath Shinde : दाढी हलकी समजू नका; दाढीची काडी फिरवली तर लंका जाळून टाकेल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com