Dilip Mohite warning : वेळप्रसंगी राजकारण सोडू, पण कळमोडीचे पाणी आंबेगावला देणार नाही; आमदार मोहितेंचा निर्वाणीचा इशारा

Kalmodi Water Issue : कळमोडी धरणातील पाणी आंबेगाव तालुक्याला नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पूर्वीही आम्ही त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे.
 MLA Dilip Mohite
MLA Dilip MohiteSarkarnama

Khed News : आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवू नका. माझा खेड तालुका तहानलेला ठेवू नका, ही आमची विनंती आहे. वेळप्रसंगी राजकारणाचा त्याग करण्याची वेळ आली तरी मी करेन. माझ्या तालुक्यातील जनतेच्या हितासाठी रक्त सांडायची वेळ आली तरी मी करेन. पण, कसल्याही परिस्थितीत आमच्या हक्काचे कळमोडीचे पाणी आम्ही आंबेगाव तालुक्याला जाऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी दिला. त्यामुळे कळमोडीचे पाणी पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. (Kalmodi water will not be given to Ambegaon : MLA Dilip Mohite's warning)

खेड (Khed) तालुक्यातील कळमोडी धरणाचे पाणी आंबेगाव तालुक्यातील पठारी भागाबरोबरच खेड तालुक्याच्या काही भागांना देण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, या धरणाच्या पाण्यावरून खेड व आंबेगाव तालुक्यात गेली अनेक वर्षांपासून राजकारण तापलेले आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भिमा नदीवरील चास कमान आणि आरळा नदीवरील कळमोडी धरण मंगळवारी (ता. १ ऑगस्ट) पूर्ण क्षमतेने भरले आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते (Dilip mohite) यांच्या हस्ते दोन्ही धरणांतील पाण्याचे पुजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

 MLA Dilip Mohite
Shirur Election : ‘पोपटराव साहेबांचे, तर बाबूराव (दादांचे) माझे उमेदवार, असा त्या निवडणुकीत प्रचार झाला’; अजितदादांनी सांगितला किस्सा

मोहिते म्हणाले की, चास कमान धरण आमच्या तालुक्यात व पुनर्वसनही माझ्याच तालुक्यात झाले आहे. असे असताना माझ्या तालुक्यातील जनतेला धरणातील फक्त अठरा टक्के पाणी आणि मृत साठ्यावर शेती व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. त्यामुळे आमचा तालुका तहानलेला राहतो की काय अशी परिस्थीती आहे. भामा आसखेड धरणातील पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवडला वळविलेले आहे.

कळमोडी धरणातील पाणी आंबेगाव तालुक्याला नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पूर्वीही आम्ही त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे. कळमोडी धरणाचे पाणी आमच्या हक्काचे असून एकाही शेतकऱ्याचे पुनर्वसन आंबेगाव तालुक्याला झालेले नाही. त्यामुळे या पाण्यासाठी आम्हाला कालही संघर्ष करावा लागला, आजही आहे. उद्याही करावा लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

 MLA Dilip Mohite
Modi Discussion with NCP Leader : मोदींनी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्याला जवळ बोलावून केली चर्चा!

आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणातील पाणी नगर जिल्ह्यातील काही तालुक्याला देण्याचा प्रयत्न आहे. ते पाणी आंबेगाव तालुक्याच्या पठार भागाला द्या. मात्र, माझा तालुका पाण्यापासून वंचित ठेवू नका. यापूर्वीही शरद पवार यांना याबाबत आम्ही विनंती केली. मात्र, आम्हाला न्याय मिळण्याऐवजी आमच्यावर अन्यायच झाला. आमच्या तालुक्याला पाण्यापासून वंचित ठेवू नका. वेळप्रसंगी राजकारणाचा त्याग करण्याची वेळ आली तरी मी करेन. पण, आमच्या हक्काचे पाणी आम्ही जाऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

 MLA Dilip Mohite
Sharad Pawar Called Meeting MVA : शरद पवारांनी पुन्हा टायमिंग साधलं; महाविकास आघाडीची बोलावली बैठक

या वेळी पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक अरूण चांभारे, उपसभापती विठ्ठल वनघरे, माजी सभापती अंकुश राक्षे, सुरेश शिंदे,राष्ट्रवादी लिगल सेलचे अॅड अरूण मुळूक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com