Basavaraj Bommai : कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले ; सोलापूर आणि अक्कलकोटवर केला दावा

Basavaraj Bommai : 40 गावांचा वाद ताजा असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितला आहे.
Basavaraj Bommai, Devendra Fadnavis
Basavaraj Bommai, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

Basavaraj Bommai : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४० गावाबाबत केलेल्या विधानानंतर कर्नाटक सीमावादाला पुन्हा फोडणी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरून महाराष्ट्रातही राजकारण पेटले आहे. बोम्मई यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.

सांगलीतील ४० गावांनी (ता. जत) कर्नाटकात समाविष्ट होण्याचा इशारा तत्कालीन राज्य सरकारला २०१२ मध्ये दिला होता. तब्बल दहा वर्षांनंतर त्या मुद्द्याचे राजकारण करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या गावांना आपल्या राज्यात समाविष्ट करून घेण्यासाठी आम्ही गांभीर्याने विचार करत असल्याचे विधान केलं आहे, त्यानंतर बोम्मई यांनी टि्वट केलं आहे.

उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केले आहे.त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोटे या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे, अशी आमची मागणी आहे, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

Basavaraj Bommai, Devendra Fadnavis
Sanjay Raut : शिंदे सरकार देवधर्म, ज्योतिष यात अडकलयं ; तुमचा स्वाभीमान कुठं शेण खातोयं..राऊत आक्रमक

40 गावांचा वाद ताजा असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितला आहे. आपल्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरून ट्वीट करत त्यांनी हा दावा केलाय. 'कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट महाराष्ट्रातील सोलापूर, आणि अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे' असं बोम्मई यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com