Sanjay Raut : शिंदे सरकार देवधर्म, ज्योतिष यात अडकलयं ; तुमचा स्वाभीमान कुठं शेण खातोयं..राऊत आक्रमक

Sanjay Raut : हे सरकार कमजोर, दुबळं सरकार आहे.
Sanjay Raut, Eknath Shinde
Sanjay Raut, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut : ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते माध्यमांशी बोलत होते. 'सध्याचं सरकार हे देवधर्म, ज्योतिष यांच्यात अडकलं आहे, असे राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (बुधवारी) शिर्डी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सिन्नर येथे एका ज्योतिषाची भेट घेतल्याची चर्चा आहे. यावर संजय राऊतांनी आज शिंदेंवर टीकास्त्र डागले.

दुष्काळाने होरपळलेल्या सांगलीतील ४० गावांनी (ता. जत) कर्नाटकात समाविष्ट होण्याचा इशारा तत्कालीन राज्य सरकारला २०१२ मध्ये दिला होता. तब्बल दहा वर्षांनंतर त्या मुद्द्याचे राजकारण करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या गावांना आपल्या राज्यात समाविष्ट करून घेण्यासाठी आम्ही गांभीर्याने विचार करत असल्याचे विधान करून सीमावादाला पुन्हा फोडणी देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरून महाराष्ट्रातही राजकारण पेटले आहे.

Sanjay Raut, Eknath Shinde
Thackeray Vs Shinde : "बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल ; ठाकरे- शिंदे गटात आज पुन्हा जुंपणार ?

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी मराठी गावे कर्नाटकात जाऊ देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तर विरोधकांनीही या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारवर टीकेची संधी साधून घेतली. यावर राऊतांनी सरकारवर टीका केली.

राऊत म्हणाले, "हे सरकार कमजोर, दुबळं सरकार आहे.कर्नाटकांच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रांच्या वर्मावर घाव घातला होता. शिंदे सरकारला लाज वाटली पाहिजे. '४० गावे कर्नाटकात जाणार नाही, असं नुसतं म्हणून चालणार नाही,' त्यावर ठामपणे भूमिका घेतली पाहिजे. सरकार गुडद्यावर बसलं आहे. स्वाभीमानी ४० आमदारांचा स्वाभीमान कुठे गेला. त्यांनी कुठे शेण खाल्लं,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com