Kasba Assembly Election : व्हायरल याद्यांनी खुश झालेल्या धंगेकरांना टेन्शनचा डबल डोस

Kasba Assembly Election MLA Ravindra Dhangekar News : पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी आज रमेश चेन्निथला यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. यावेळी कसब्यातून मुस्लिम उमेदवार द्यावा अशी मागणी करत काँग्रेसचे जेष्ठ नेते मुक्तार शेख यांचं नाव समोर करण्यात आलं. तुमच्या मागणीवर सकारात्मक विचार करू, असं चेन्निथला यांनी सांगितल्याची माहिती आहे.
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 19 Oct : विधानसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सर्वच इच्छुकांना पक्षाकडून जाहीर होणाऱ्या उमेदवार याद्यांची प्रतिक्षा आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी काँग्रेसची (Congress) एक उमेदवार यादी व्हायरल झाली होती.

या व्हायरल यादीमध्ये कसबा विधानसभा (Kasba Assembly Constituency) मतदारसंघामधून पुन्हा एकदा विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांना संधी दिली असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. ही व्हायरल यादी पाहून खुश झालेल्या रवींद्र धंगेकरांनी आपल्या सोशल मीडियावर ती यादी प्रसिद्ध देखील केली.

मात्र काही वेळातच ती यादी खोटी असल्याचं समोर आल्यानंतर त्यांना ती पोस्ट डिलीट करावी लागली. यानंतर काँग्रेसच्या (Congress) ज्येष्ठ महिला नेत्या माजी महापौर कमल व्यवहारे यांनी काही झालं तरी कसब्यातून आपणच निवडणूक लढणार असल्याचं जाहीर करून धंगेकरांचा टेन्शन वाढवलं.

हे थोडं होतं म्हणूनच शनिवारी (ता.19) काँग्रेसच्या एका नेत्याने कसबा विधानसभा उमेदवारीसाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी असलेल्या रमेश चेन्निथला यांची भेट घेतली आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी धंगेकरांना (Ravindra Dhangekar) टेन्शनचा डबल डोस मिळाल्याचे बोलले जात आहे.

Ravindra Dhangekar
Laxman Hake : "...तर मी त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार..." लक्ष्मण हाकेंचं जरांगे पाटलांना 'ओपन चॅलेंज'

पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील काँग्रेसच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी आज रमेश चेन्निथला यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. यावेळी कसब्यातून मुस्लिम उमेदवार द्यावा अशी मागणी करत काँग्रेसचे जेष्ठ नेते मुक्तार शेख यांचं नाव समोर करण्यात आलं. तुमच्या मागणीवर सकारात्मक विचार करू, असं चेन्निथला यांनी सांगितल्याची माहिती आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर असून त्यांच्या ऐवजी मुस्लिम समाजाला संधी देण्याची मागणी होत आहे. या भेटी संदर्भात बोलताना मुख्तार शेख म्हणाले, "गेल्या 40 वर्षांपासून मी काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. आत्तापर्यंत काँग्रेसने जी जबाबदारी दिली समर्थपणे पार पाडली आहे. मी आणि मुस्लिम समाज नेहमीच काँग्रेससोबत राहिलो आहोत. आता या निवडणुकीत आम्हाला प्रतिनिधित्व मिळायला हवं.

मला कसबा विधानसभा मतदारसंघातील अनेक नागरिक भेटायला आले नागरिकांना विद्यमान आमदार भेटत नसल्याची तक्रार त्यांनी केली. त्यानंतर या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांची भावना मी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली असून मला उमेदवारी मिळावी यासाठी राहुल गांधी यांच्यापासून नाना पटोले यांच्यापर्यंत सगळ्यांच्याच कानावर ही बाब मी घातली आहे.

Ravindra Dhangekar
Akhilesh Yadav News : महाविकास आघाडीची चर्चाच सुरू, 'सपा'कडून उमेदवारही जाहीर ; आता अखिलेश यादवांचंही मोठं विधान, म्हणाले...

कसब्यातील उमेदवारी संदर्भात आम्ही शरद पवार यांना देखील भेटलो. त्यावेळी पवारांनी मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला खूप मदत केल्याची भावना बोलून दाखवली असून मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळायला हवं असं म्हटलं. आमच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत मी तुमच्याबद्दल बोलेन असं आश्वासन शरद पवार यांनी आम्हाला दिलं."

दरम्यान, भाजपमधून कसब्याचा उमेदवार ब्राह्मण असावा असा आग्रह धरण्यात येत असतानाच आता काँग्रेसमध्ये मुस्लिम उमेदवारासाठी आग्रह धरण्यात येत आहेत. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोघांचीही डोकेदुखी यामुळे वाढल्याचं बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com