Laxman Hake : "...तर मी त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार..." लक्ष्मण हाकेंचं जरांगे पाटलांना 'ओपन चॅलेंज'

OBC Reservation News Laxman Hake on Manoj Jarange Patil : "कोणत्याही ओबीसी मतदाराने यांना मतदान करू नये अन्यथा ओबीसीचे आरक्षण संपुष्टात येईल. महाविकास आघाडीकडून लढणार्‍या ओबीसी नेत्यांनी आधी ओबीसींची याबाबतची भूमिका स्पष्ट करून घ्यावी, अन्यथा तुम्हाला ओबीसी मतदान करणार नाहीत."
Laxman Hake, Manoj Jarange Patil
Laxman Hake, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

OBC Reservation News : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यामुळे मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा देत विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करू नका, असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं आहे. तर आता मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी महाविकास आघाडीला ओबीसी मतदान करणार नाहीत, असं म्हटलं आहे.

शिवाय मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्याविरोधात त्याच मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे आता ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

जरांगे सुपारीबाज नेते

लक्ष्मण हाके म्हणाले, "मनोज जरांगे हे जर निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्या विरोधात त्याच मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार. जरांगे जागाही लढवत नसतात आणि काहीच करत नसतात, ते एक सुपारीबाज नेते आहेत. महाराष्ट्र विधानसभेला तुतारी, मशाल आणि पंजाला म्हणजेच महाविकास आघाडीला ओबीसी (OBC) मतदान करणार नाहीत.

Laxman Hake, Manoj Jarange Patil
NCP Politics: भाजप नेते गणेश गीतेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश रखडला?, नेते म्हणाले, थोडे थांबा!

कोणत्याही ओबीसी मतदाराने यांना मतदान करू नये अन्यथा ओबीसीचे आरक्षण संपुष्टात येईल. महाविकास आघाडीकडून लढणार्‍या ओबीसी नेत्यांनी आधी ओबीसींची याबाबतची भूमिका स्पष्ट करून घ्यावी, अन्यथा तुम्हाला ओबीसी मतदान करणार नाहीत.

Laxman Hake, Manoj Jarange Patil
Sharad Pawar VS Ajit pawar : अजितदादांकडून 1 हजार 884 कोटींची मदत, तरीही 'या' नेत्यानं धोका पत्करलाच; 'तुतारी' हाती घेणार

तुम्ही आमचे नेते असून तुम्हाला मतं द्यायची आम्हाला खूप इच्छा आहे. मात्र जे ओबीसी आरक्षण संपवायला निघालेत त्यांच्या पक्षातून तुम्ही उभारल्यास इच्छा असूनही ओबीसी समाज तुम्हाला मतदान करणार नाही," अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीला आणि 'मविआ'तील ओबीसी नेत्यांना इशारा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com