Kasba By Election : काँग्रेस उमेदवार धंगेकरांच्या फ्लेक्सवरून राष्ट्रवादी गायब? आघाडीत बिघाडी?

Kasba By Election : नेत्यांचे फोटो गायब का?
Kasba By Election :
Kasba By Election :Sarkarnama
Published on
Updated on

Kasba By Election : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांसाठी जंगी प्रचाराचा माहौल आहे. जोरदार विविध पक्षांकडून रणधुमाळी दिसून येत आहे. आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून नारळ फोडून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. मात्र असे असतानाच महाविकास आघाडीत धुसफूस आहे का?अशी शंका उपस्थित होणार बाब समोर आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचार फलकावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो गायब असल्याचे दिसून आले.

Kasba By Election :
Beed Politics : धनंजय मुंडेंच्या स्वागताला संसदेचा देखावा; पंकजांचे टेन्शन वाढले...

कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून असलेले काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा एक प्रचार फलक लावण्यात आलेला आहे. या फसकावर काँग्रेसचे दोन नेत अशोक चव्हाण व विश्वजीत कदम यांचे फोटो आहेत. शिवसेनेचे नेत्या निलम गोरे यांचा फोटो आहे, तर आरपीआय गवई गटाचे नेते राजेंद्र गवई यांचाही फोटो आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणत्याही नेत्याचा फोटो फलकावर नाही.

Kasba By Election :
Bhagat Singh Koshyari : मंत्रिमंडळ बैठकीत कोश्यारींच्या अभिनंदनाचा ठराव : भाजपने विरोधकांना पुन्हा डिवचले

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाचा उल्लेख असला तरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांचा फलकावर फोटोच नसल्याने आता महाविकास आघाडीत बिघाडी असल्याची चर्चा होत आहे. काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसब्यामध्ये प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यांच्या मतदार संघात ठिकठिकाणी सभाही सुरू झाल्या आहेत. दरम्यान प्रचार सभेच्या लावलेल्या बॅनर्सवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकही नेत्यांचे फोटो नाही. यामुळे कसब्यात महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य सुरु झालं आहे का असा मुद्दा उपस्थित होत आहे.काँग्रेसने लावलेल्या बॅनर्सवर शरद पवार, अजित पवार यांचे फोटो नाही, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तर काँग्रेसच्या प्रचार सभेमध्ये लावण्यात आलेल्या बॅनरवर अशोक चव्हाण, नीलम गोऱ्हे, विश्वजित कदम, राजेंद्र गवई यांचे फोटो आहेत. तसेच काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेत्यांची नावे आहेत. परंतु कुठेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे नाव किंवा फोटो नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com