Pune News : आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कसबा मतदारसंघातून भाजपकडून हेमंत रासने यांनाच निवडणूक रिंगणात उतरवण्यात येईल, असे संकेत खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील 'कोणीही आलं तरी मीच मैदान मारणार', असे म्हणत दंड थोपटले आहेत. यावर आता हेमंत रासने यांनीही प्रतिक्रिया दिली.
'मी 1988 पासून भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. या सर्व वर्षांमध्ये भाजपने माझ्यावरती अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या, त्या माझ्या क्षमतेनुसार मी समर्थपणे पेलल्या. 2022 ची पोटनिवडणूक लढण्याची पक्षाने माझ्यावरती जबाबदारी दिली मात्र, थोड्याफार फरकाने मला पराभवाचा सामना करावा लागला. मी तो पराभव स्वीकारला असून दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो', असे हेमंत रासने म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'मी वैयक्तिकरित्या कसबा पोटनिवडणुकीमध्ये झालेला पराभव स्वीकारला आणि दुसऱ्या दिवसांपासून कामाला लागलो. या गोष्टी वरिष्ठांना भावल्याने माझ्यावरती आगामी निवडणुकांसाठी कसबा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. त्या दृष्टिकोनातून संघटनात्मक बदल करून लोकसभा आणि विधानसभेला कसबा मतदारसंघामधून भाजपला कसे मताधिक्य मिळेल, याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यामुळे पुढचा आमदार तसेच कसबा मतदारसंघातील सर्व नगरसेवक हे भाजपचे असतील', असा विश्वास रासने यांनी व्यक्त केला.
'आतापर्यंत कसब्यामध्ये दोनदा पोटनिवडणूक झाली. यापूर्वी देखील भाजपला पोटनिवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. पोटनिवडणुकीमध्ये कसब्याची जनता आम्हाला चिमटा काढते, जेणेकरून आम्ही अधिक जोमाने काम करू शकू'.
1992 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पाच वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे दिवंगत खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांना देखील पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. मात्र, पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर पुढील पाच निवडणुकांमध्ये आम्ही जिंकतो हा इतिहास आहे आणि भविष्यात या इतिहासाची पुनरावृत्ती होईल', असा विश्वास रासने यांनी व्यक्त केला.
(Edited By - Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.