Katewadi Politics : काटेवाडीत राजकीय सामंजस्याचा नवा अध्याय; विजयी सदस्यांसह पराभूत उमेदवारांचाही सन्मान

Sharad Pawar And Ajit Pawar : गावाच्या विकासासाठी मतभेद बाजूला ठेवून काम करण्याचा गावातील नेत्यांचा चंग
Katewadi Gram Panchyat
Katewadi Gram PanchyatSarkarnama
Published on
Updated on

रवीकिरण सासवडे

Baramati Political News : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राज्यातील काही गावांमध्ये आपापसात वितुष्ट निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. काही गावांतील विरोधी गटांचे वाद अगदी पोलिस ठाण्यापर्यंत गेले. राजकीय चुरशीच्या अशा वातावरणात बारामती तालुक्यातील काटेवाडीमध्ये मात्र राजकीय सामंजस्याचा नवा अध्याय रचला गेला आहे. येथे विजयी सदस्यांसह पराभूत उमेदवारांचाही सन्मान करण्यात आला. (Latest Political News)

काटेवाडी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी येथील पालखी ओठा परिसरात हा आगळावेगळा उपक्रम दिमाखात पार पडला. तत्पूर्वी काटेवाडी प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी नव्याने युवराज काटे यांची निवड या वेळी करण्यात आली. दरम्यान, मागील पंधरा दिवस ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीमुळे काटेवाडीतील राजकीय वातावरण तापले होते. अगदी मतदानाच्या दिवसापर्यंत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचे येथील नागरिकांनी पाहिल्या.

Katewadi Gram Panchyat
Sharad Pawar Amit Shah : रामलल्लाच्या नावाने मते मागणाऱ्या अमित शाहांना पवारांनी दाखवला आरसा

एकदाची निवडणूक पार पडल्यानंतर मात्र गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत राजकीय मतभेद बाजूला ठेवले. तसेच गावच्या विकासासाठी आम्ही सर्वजण सोबत असल्याचा नाराही दिला. काटेवाडी प्रतिष्ठानच्या वतीने सर्व नवनिर्वाचित सरपंच मंदाकिनी भिसे, सदस्य तसेच पराभूत उमेदवारांचाही एकाच मंचावर सत्कार करण्यात आला.

या वेळी शिवाजी काटे, अॅड. संभाजी काटे, सिकंदर मुलाणी, भारत जाधव, सतीश देशमुख, वसंत देवकाते, पोपट घुले, अमीर पठाण, प्रदीपकुमार काटे, रामभाऊ ठोंबरे, शरद लोंढे, अमीर मुलाणी, दिलीप काटे, रणजित गायकवाड, सचिन मासाळ, पोलिस पाटील सचिन मोरे, प्रकाश गरदडे आदी उपस्थित होते. (Maharashtra Political News)

Katewadi Gram Panchyat
Tanaji Sawant : धाराशिवमधील सर्व कारखानदारांना आरोग्यमंत्री सावंतांचे ओपन चॅलेंज ! म्हणाले...

काय म्हणाले गावातील नेते ?

या उपक्रमाबाबत बोलताना राष्ट्रवादीचे शीतलकुमार काटे यांनी, 'गावच्या विकासासाठी सर्वांनी सोबत काम करावे. सर्वांची सोबत असली तरच आपल्या गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो,' असे सांगितले, तर 'सरपंच यांनी सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन गावाचे प्रशासन चालवावे. निवडून आलेल्या महिला सदस्यांना प्रशासकीय कारभारामध्ये सहभागी करून घ्यावे. घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी सरपंचांनी विशेष लक्ष द्यावे,' अशी अपेक्षा शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदेंनी व्यक्त केली. (Baramati News)

गावाच्या विकासासाठी नेहमीच साथ देण्याची घोषणा भाजपच्या वतीने करण्यात आली. भाजपचे पांडुरंग कचरे म्हणाले, 'नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांना आमचे पूर्ण सहकार्य राहील. गावाच्या विकासासाठी आम्ही सोबत आहोत. केंद्रात व राज्यात ज्या पद्धतीने आपण सर्व एकत्र आहोत तसेच गावपातळीवरदेखील सोबत राहू.'

(Edited by Sunil Dhumal)

Katewadi Gram Panchyat
Sharad Pawar Live : 'तो' जातीचा दाखला खरा, पण...; व्हायरल दाखल्यांवर शरद पवारांनी स्पष्टच सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com