MLC Election : शिक्षकांच्या प्रश्नांवर कौस्तुभ गावडेंचा वचननामा; भरती, TET आणि CHB प्राध्यापकांसाठी दिली आश्वासने

Pune Teachers Constituency: पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी वचननाम्यात शिक्षक भरती, TET मधून सूट आणि CHB प्राध्यापकांच्या मानधनवाढीसह सेवेला स्थैर्य देण्यासाठी पाठपुराव्याची आश्वासने दिली आहेत.
BJP Candidate Kaustubh Gawade
BJP Candidate Kaustubh GawadeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune Teachers Constituency News: शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे, वर्षानुवर्षे सेवा बजावणाऱ्या शिक्षकांसमोरील TET सक्तीचा प्रश्न आणि तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या सेवेला स्थैर्य मिळण्याची मागणी… शिक्षण क्षेत्रातील या प्रलंबित प्रश्नांवर पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी आपल्या वचननाम्यात विविध आश्वासने दिली आहेत. १०० टक्के मंजूर रिक्त पदांची भरती, नियमित TAIT परीक्षा, TET मधून सूट मिळवण्यासाठी पाठपुरावा आणि CHB प्राध्यापकांच्या मानधनासह सेवा-सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी आपल्या वचननाम्यात याच प्रश्नांशी संबंधित काही महत्त्वाची आश्वासने दिली आहेत. नेमकी ही आश्वासने काय आहेत? आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत?

अनेक अनेक वर्षांपासून शिक्षकांचे प्रश्न जैसे थे आहेत. विद्यमान आमदारांनी या प्रश्नासाठी कोणता लढा दिला? किंवा कोणता प्रश्न मार्गी लावला? असा सवाल गावडे यांनी प्रचारादरम्यान केला आहे. त्यामुळे नेहमीच आपल्या मागण्यापासून वंचित राहिलेलेल्या शिक्षकाला कौस्तुभ गावडे यांनी महत्वाची आश्वासने दिली आहेत.

गावडे यांनी हजारो शिक्षकांना पहिलं आश्वासन आहे, १०० टक्के मंजूर रिक्त पदांची भरती करण्यासाठी पाठपुरावा करण्याचं. शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त राहिली, तर त्याचा परिणाम केवळ शिक्षकांवर होत नाही; विद्यार्थ्यांच्या अध्यापनावरही होतो. त्यामुळे रिक्त पदं भरणं आणि शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शाळांना शिक्षक उपलब्ध करून देणं, हा या मुद्द्याचा केंद्रबिंदू आहे.

दुसरं, पवित्र पोर्टलद्वारे मंजूर रिक्त पदांची भरती, दरवर्षी नियमितपणे TAIT म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेणं आणि भरतीसाठी निश्चित वेळापत्रक तयार करण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय. भरती प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.

BJP Candidate Kaustubh Gawade
Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार? CM फडणवीस-चंद्रकांत पाटलांच्या हालचाली, जयंत पाटलांशी चर्चेची शक्यता

दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा.

वर्षानुवर्षे सेवा बजावलेल्या शिक्षकांनाही TET सक्तीच्या प्रश्नाला सामोरं जावं लागत असल्याने शिक्षकांमध्ये चिंता आहे. विशेषतः १३ फेब्रुवारी २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना या परीक्षेतून सूट मिळावी, अशी भूमिका गावडे यांनी वचननाम्यात मांडली आहे. या मागणीसाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखून पुनर्विचारासाठी आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

तिसरं आश्वासन आहे तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या, म्हणजेच CHB प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत. अनेक प्राध्यापक तासिका तत्त्वावर अध्यापन करतात. त्यांच्या मानधनात वाढ, नियुक्तीचा कालावधी, सेवेला स्थैर्य आणि नियमित भरतीमध्ये अनुभवाला प्राधान्य अशा मागण्या या घटकासाठी महत्त्वाच्या आहेत. कौस्तुभ गावडे यांनी CHB प्राध्यापकांच्या मानधनात सन्मानजनक वाढ, ११ महिन्यांची नियुक्ती, सेवेला स्थैर्य आणि Ad-hoc Full-Time नियुक्तीसह मूळ वेतन मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचं आश्वासन दिलं आहे. याशिवाय, नियमित भरतीत अनुभवाला प्राधान्य, हक्काच्या रजा आणि वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठीही पाठपुरावा करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे.

BJP Candidate Kaustubh Gawade
Prashant Bamb : मराठवाडा पदवीधरचे सतीश चव्हाण यांच्यासाठी प्रशांत बंब यांनी यंत्रणा लावली कामाला, राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून आणण्याचाही दावा

या आश्वासनांची अंमलबजावणी करताना मानधनासाठी निधी, नियुक्तीचे नियम, संबंधित विद्यापीठे आणि संस्थांची भूमिका तसेच शासनाचे निर्णय महत्त्वाचे ठरणार आहेत. म्हणजेच, मागण्यांना मान्यता मिळवून देण्याबरोबरच त्यासाठी ठोस धोरण आणि अंमलबजावणीची प्रक्रिया निश्चित करणं आवश्यक असेल. त्यासाठी राज्यातील सत्तेचा उपयोग गावडे यांना होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com