Ketan Agrawal Case: लोहगडावर केतनची हत्या; नातवाच्या विरहानं आजोबांनीही सोडले प्राण, देवीचंद अग्रवाल यांचे निधन

Ketan Agrawal Grandfather Devichand Agrawal death:लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालच्या हत्येनंतर त्यांच्या आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे निधन झाले. नातवाच्या मृत्यूच्या धक्क्यातून ते सावरू शकले नव्हते.
Ketan Agrawal Grandfather Devichand Agrawal death
Ketan Agrawal Grandfather Devichand Agrawal deathSarkarnama
Published on
Updated on

Pune News: लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालच्या हत्येनंतर अग्रवाल कुटुंबावर आणखी एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतनचे आजोबा देवीचंद किसनलाल अग्रवाल यांचे दुःखद निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नातवाच्या हत्येच्या धक्क्यातून ते सावरले नव्हते. केतनच्या हत्येनंतर आणि आता आजोबांच्या निधनामुळे अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा दुहेरी आघात झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोहगड किल्ल्यावर १८ जून रोजी घडलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाने राज्यभरात खळबळ उडाली होती. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी त्याला किल्ल्यावरून ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर अग्रवाल कुटुंब पूर्णपणे हादरले होते.

Ketan Agrawal Grandfather Devichand Agrawal death
Siya Goyal Viral Video: केतनचा जीव घेतल्यानंतरही सियाची मुजोरी कायम? पोलीस कोठडीतून बाहेर येताच केले अश्लील हावभाव

नातवाच्या मृत्यूचा देवीचंद अग्रवाल यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. केतनला न्याय मिळावा यासाठी त्यांनी आंदोलनातही सक्रिय सहभाग घेतला होता. २७ जून रोजी पुण्यातील गहुंजे येथे आयोजित कँडल मार्चमध्येही ते सहभागी झाले होते. त्यावेळी “आपल्याच लोकांनी विश्वासघात केला” अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.

Ketan Agrawal Grandfather Devichand Agrawal death
Siya Goyal News: केतनची हत्या कशी झाली? सियासमोर 18 प्रश्न; लाय डिटेक्टर टेस्टमधून उलगडणार 18 जूनची मर्डर मिस्ट्री?

देवीचंद अग्रवाल हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हृदयाशी संबंधित मोठी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली होती. प्रकृतीत सुधारणा होत असतानाच नातू केतनच्या हत्येची बातमी समोर आली आणि त्यांना जबर मानसिक धक्का बसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

देवीचंद अग्रवाल यांची अंत्ययात्रा आज,(५ जुलै)सकाळी १० वाजता लोढा बेलमांटो सोसायटी येथून निघणार असून, निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com