Saam Exit Poll 2024 : खडकवासल्यात दोडकेंनी फटाके फोडले; मात्र विजयाची माळ तापकिरांच्या गळ्यात पडण्याची शक्यता

Will Tapkir secure victory in Khadakwasla despite Dodke’s celebrations? : महायुतीकडून तिसऱ्यांदा विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना संधी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात दुसऱ्यांदा आघाडीकडून सचिन दोडके यांना रिंगणात उतरवण्यात आले.
Bhimrao Tapkir, Sachin dodke
Bhimrao Tapkir, Sachin dodke Sarkarnama
Published on
Updated on

Khadakwasla Assembly constituency: यंदा खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये तिहेरी लढत पहायला मिळाली. महायुतीकडून तिसऱ्यांदा विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना संधी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात दुसऱ्यांदा आघाडीकडून सचिन दोडके यांना रिंगणात उतरवण्यात आले. मात्र, माजी आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे मनसेकडून निवडणूक मैदानात उतरल्याने खडकवासल्यातील सामना अधिकच रंजक ठरला.

खडकवासला विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांना विजयाचा कॉन्फिडन्स असून त्यांनी मतदानाच्या दिवशीच सायंकाळी फटाके फोडत विजयी मिरवणूक काढण्यात आली. तसेच मतदार संघामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी देखील करण्यात आली. विजयाचा कॉन्फिडन्स असला तरी साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये मात्र विद्यमान आमदार भीमराव तापकीर पुन्हा एकदा बाजी मारत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Bhimrao Tapkir, Sachin dodke
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील सत्तेची चावी असणार अपक्षांच्या हाती; सोलापुरातील 'या' उमेदवारांवर असणार 'वॉच'

दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर 2011 ला पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीमध्ये भीमराव तापकीर हे पहिल्यांदा खडकवासला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते 2014 आणि 2019 ला पुन्हा निवडून आले. 2019 ला त्यांना अवघ्या अडीच हजार मतांनी विजय मिळाला यावेळी सचिन दोडके यांनी चांगली फाईट दिली.

Bhimrao Tapkir, Sachin dodke
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरची जादू दिसणार का? काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे

भीमराव तापकीर यांना उमेदवारी देण्याबाबत भाजपमध्ये अंतर्गत विरोध पाहायला मिळाला. भाजपच्या स्थानिक नगरसेवकांनी उमेदवार बदलावा, अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली होती. मात्र, भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेते मंडळींनी पुन्हा एकदा भीमराव तापकीर यांच्यावर विश्वास दाखवला आणि सध्याचे चित्र पाहिल्यास साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये भीमराव तापकीर यांचे पारड जड दिसत असल्याने पक्षश्रेष्ठींचा निर्णय योग्य असल्याचे बोलले जात आहे.

Bhimrao Tapkir, Sachin dodke
Maharashtra Assembly Election Exit Poll: निकालास काही तास शिल्लक असताना राजकीय विश्लेषकाचा बहुमताबाबत मोठा दावा

गेल्या काही वर्षांमध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा गड झाला आहे. या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपला मानणार मोठा मतदार आहे. मतदारसंघात 'आरएसएस' चे संघटन मजबूत आहे. विधानसभा मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये येतो. गेल्या तीन लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे या लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत असल्या तरी खडकवासला विधानसभा मतदारसंघात मात्र त्यांना आघाडी घेण्यात अद्याप यश आलेले नाही.

त्यामुळे हा विधानसभा मतदारसंघ सातत्याने भाजपच्या आणि महायुतीच्या पाठीशी उभा राहत असल्याचं वारंवार दिसून आला आहे. त्यामुळे भीमराव तापकिर यांचे पारडे जड दिसत असलं तरी दोडके यांना देखील विजयाचा कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे उद्या निकालाच्या दिवशी नेमकं काय परिस्थिती राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Bhimrao Tapkir, Sachin dodke
Maharashtra Highest Voting : मतदारांनी सगळी गणितं चुकवली! 30 वर्षांनी पहिल्यांदाच मतांचा विक्रमी टक्का

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com