Ramdas Athawale Koregaon Bhima : 200 एकर जमीन 200 कोटींचा निधी, कोरेगाव भीमासाठी आठवलेंच्या मनात काय?

Koregaon Bhima : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे दरवर्षी शौर्य दिना दिवशी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हजेरी लावली. यावेळी आठवले एक खास कविता म्हणाले, एकदा ऐकाच...
Ramdas Athawale Koregaon Bhima Shaurya Din
Ramdas Athawale Koregaon Bhima Shaurya Din Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे दरवर्षी शौर्य दिन साजरा करण्यात येतो, राज्यभरातून अनुयायी एक जानेवारीला या ठिकाणी उपस्थिती लावतात. त्यांच्यासोबतच विविध नेते मंडळी देखील या ठिकाणी येऊन अभिवादन करतात. आज विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हजेरी लावली, यावेळी त्यांनी खास कविता सादर केली.

विजय स्तंभास अभिवादन केल्यानंतर रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शौर्य दिनानिमित्त रामदास आठवले यांची खास कविता केली. आठवले म्हणाले, भीमा कोरेगावची ऐकल्यानंतर शौर्यगाथा उंच होतो आमचा माथा.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आमचा दाता, जो बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करेल त्याला घालू आम्ही लाथा, कोरेगाव स्तंभाला मी सलाम करतो जाता जाता.

Ramdas Athawale Koregaon Bhima Shaurya Din
Dattatray Bharne : वाल्मिक कराडमुळे अडचण, धनंजय मुंडेंच्या मदतीला राष्ट्रवादीचे मंत्री धावले!

आठवले पुढे म्हणाले, आमच्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. 207 वर्षापूर्वी आमच्या समाजाने शौर्य दाखवत पेशव्यांना पळून लावण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या प्रित्यर्थ या ठिकाणी स्मारक उभारण्यात आला आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील दरवर्षी येत असत आता राज्य भरातून लाखो अनुयायी या ठिकाणी येतात.

भीमा कोरेगाव या ठिकाणी या शौर्य स्तंभाचं मोठं असं स्मारक होणे आवश्यक आहे.स्मारक करण्यासाठी सरकारने लक्ष घातलं आहे. पण अद्याप स्मारक पूर्ण झालं नाही. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांची भेट घेऊन निधी मंजूर करणार आहे.

Ramdas Athawale Koregaon Bhima Shaurya Din
Koregaon Bhima Shaurya Din : "जनतेच्या मतावर निवडून आले..."; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री कोरेगाव-भीमाला न आल्याने आंबेडकरांची नाराजी

यासाठी १०० ते २०० कोटी मंजूर करण्या बरोबरच स्मारकासाठी २०० एकर जमीन मिळावी ही आमची मागणी आहे. ज्यांची जमीन आहे, त्यांना ही मोबदला मिळाला पाहिजे, त्यांचं पुनर्वसन व्हावं असं देखील रामदास आठवले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com