Pune Lok Sabha Election News : पुण्यात महाविकास आघाडीमध्ये तू तू, मैं मैं सुरूच

Latest News On Pune Loksabha : ठाकरेंच्या सभेवरून मतमतांतर सध्या सुरू आहेत. आता पुन्हा एकदा ठाकरेंची सभा नेमक्या कोणत्या विधानसभा मतदारसंघांमध्ये घ्यायची यावरून वाद निर्माण झाला असल्याचं समोर आलं आहे.
Pune Lok Sabha Election News
Pune Lok Sabha Election NewsSarkarnama

Pune News : पुणे लोकसभेची निवडणूक आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी अनेक आव्हान निर्माण करणारी ठरत आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी पक्षांतर्गत विरोध, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजी नाट्य आणि प्रचारादरम्यान महाविकास आघाडीतील पक्षांमधील होणारी बिघाडी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. आता पुन्हा एकदा ठाकरेंची सभा नेमक्या कोणत्या विधानसभा मतदारसंघांमध्ये घ्यायची यावरून वाद निर्माण झाला असल्याचं समोर आलं आहे. Latest update on pune Lok Sabha News

सध्या पुणे लोकसभा मतदारसंघातील प्रचार अंतिम टप्प्यात आहे. या अंतिम टप्प्यामध्ये जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून वातावरण निर्मिती करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे. या टप्प्यामध्ये मुख्यत्वे पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या सभा अनेक अर्थांनी गेम चेंजर ठरण्याची शक्यता असल्याने या सभांचे नियोजन अतिशय काळजीपूर्वक करण्यात येत आहे. त्यामुळे या सभांच्या नियोजन करण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहेत. मात्र या सभांच्या नियोजनावरूनदेखील काँग्रेसमध्ये अंतर्गत आणि महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये मतभेद होताना पाहायला मिळत आहेत. Mahavikas Aghadi News.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी ३ मे रोजी पुण्यामध्ये प्रचार सभा घेण्यात येणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे. ज्या एसपी कॉलेजच्या मैदानावरती सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असल्याचे सांगण्यात आलं होतं, आता त्याच मैदानावरती राहुल गांधी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेणार आहेत.

राहुल गांधी यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीदेखील सभा पुण्यामध्ये होणार आहे. तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचीदेखील पुण्यामध्ये रॅली आणि सभा व्हावी, यासाठी यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील असून, त्याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे.

Pune Lok Sabha Election News
Amol Kolhe News : ओवेसींना केलेला विरोध अमोल कोल्हेंना भोवणार? नेमकं प्रकरण काय

या नियोजना प्रसंगी काही काँग्रेस पदाधिकारी कोथरूड विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांची सभा घ्यावी यासाठी आग्रही होते, मात्र यावरूनच पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray किंवा युवा नेते आदित्य ठाकरे यांची कोथरूडमध्ये सभा घेतली, तर येत्या काळात विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत कोथरूडच्या जागेची मागणी होणार, अशी शक्यता असल्याने कोथरूडमध्ये सभा घेण्याला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट ShivsenaUBT आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar यांचा विजय झाला. यामध्ये कुठेतरी आदित्य ठाकरे यांची झालेली जंगी रॅली तितकीच महत्त्वपूर्ण ठरल्याचे बोलले जात आहे. पोटनिवडणुकीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यामुळे मतदारसंघांमध्ये वातावरण निर्मितीदेखील झाली होती. याचाच फायदा कुठेतरी धंगेकरांना झाल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवरती आता रवींद्र धंगेकर यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी Loksabha Election आदित्य ठाकरेंची रॅली आणि सभा नेमका कोणत्या ठिकाणी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

R

Pune Lok Sabha Election News
Pawar's Daund Tour : पवारांचे दौंडकडे विशेष लक्ष; काल रोहित पवारांचा, तर आज जय पवारांचा दौरा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com