Sanjay Gaikwad controversy : 3 कोटींची रोकड अन् 100 बोकड: संजय गायकवाडांचा हा 'पॅटर्न' स्थानिकच्या इच्छुकांत धडकी भरवणारा?

Maharashtra politics scandal News : शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.
Sanjay Gaikwad
Sanjay GaikwadSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड नेहमीच वादग्रस्त विधाने करीत असतात. गेल्या दोन महिन्यापूर्वीच विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनवेळी कँटिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने गायकवाड हे चांगलेच चर्चेत आले होते. त्याच गायकवाड यांच्यामागील अडचणीचे शुक्लकाष्ट काही संपण्याचे नाव घेताना दिसत नाही. नेहमीच ते अंगावर नवीन वाद ओढवून घेत असतात.

दोन महिन्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तंबी देऊनही त्यांनी पुन्हा एकदा नवीन वाद ओढवून घेतला आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत करण्यात येणाऱ्या खर्चाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाची चर्चा रंगली आहे. त्यांच्या या विधानानंतर निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.

आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या कथित 'पॅटर्न'मुळे राज्याच्या राजकारणात एक नवीन वादळ उठले आहे. तीन कोटींची रोकड आणि शंभर बोकड वाटल्याच्या घटनेनंतर, ही केवळ निवडणुका जिंकण्यासाठीची रणनीती आहे की राजकारणात 'धनशक्ती'चा वापर वाढला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पहिले जात आहे.

Sanjay Gaikwad
Narendra Modi : मोठा धमाका होणार! पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आज संबोधित करणार

एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी बोलताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेत होणारा प्रचंड खर्च आणि कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला आहे. पूर्वीच्या तुलनेत आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खूप खर्चिक झाल्या आहेत. काही ठिकाणी उमेदवाराला एक-दोन कोटी, तर कधी तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. इतकेच नव्हे, तर काही ठिकाणी 100 बोकड द्यावे लागतात, अशी परिस्थिती झाली आहे.

एवढ्या मोठ्या खर्चामुळे सामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणे अशक्यप्राय ठरते. आमदार गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे निवडणुकीतील अनैतिक पद्धती आणि मोठ्या प्रमाणात होणारा खर्च यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारणातील खर्चाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Sanjay Gaikwad
Shivsena controversy : आनंद दिघेंबाबतचं 'ते' वक्तव्य शिंदेंच्या शिलेदाराच्या जिव्हारी; म्हणाले, 'राऊत सर्वात मोठे गद्दार, युतीतून निवडून येऊनही ठाकरेंना...'

गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावर एका काँग्रेस नेत्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी 'खोक्यांची आणि बोक्यांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे? त्यांच्या पोटात जे होतं ते ओठात आलं,' असे म्हटले आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यावर यावर काँग्रेस नेते विजय वडेटीवार यांनी टीका केली. आमदार महेश सावंत यांनीही याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे येत्या काळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Sanjay Gaikwad
Narendra Modi Vs. Mallikarjun Kharge : मोदींनी हल्लाबोल करताच खर्गेनींही 'या' मुद्द्यावरून भाजपला डिवचले...

धनशक्ती'चे राजकारण

ही कृती म्हणजे 'धनशक्ती'चे राजकारण अशीच मानली जात आहे. निवडणुकीसाठी थेट एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वाटणे हे लोकशाही मूल्यांसाठी धोकादायक आहे. हे मतदारांना प्रभावित करण्याचा एक मार्ग असू शकतो, ज्यामुळे निवडणुकांमध्ये पैशाचा गैरवापर होतो आणि निवडणुका निष्पक्षपणे होत नाहीत. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार निवडणुकीत होणाऱ्या खर्चावर मर्यादा आहेत. अशा प्रकारची रोकड वाटणे हे निवडणूक खर्चाचे नियम धाब्यावर बसवते.

Sanjay Gaikwad
Narendra Modi : नवरात्रीच्या शुभेच्छा देत पीएम मोदींनी उचलेले आत्मनिर्भर भारतासाठी मोठे पाऊल; उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार

निवडणूक आयोगासमोर आव्हान

निवडणुकांमध्ये कोट्यवधी रुपयांचा वापर सर्वत्र होत आहे. गायकवाड यांच्या विधानातूनच उमेदवारांना लागणाऱ्या ‘खर्चाच्या वास्तवाला’ अधोरेखित केले आहे. त्यामुळे अधिकृत खर्च मर्यादा असली तरी प्रत्यक्ष खर्च त्यापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्यामुळे निवडणूक काळात होत असलेला काळ्या पैशाचा ओघ रोखण्यात निवडणूक आयोग किती सक्षम? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

संजय गायकवाडांचा हा 'पॅटर्न' केवळ येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीची तयारी नसून, तो एक प्रकारे 'धनशक्ती'चे प्रदर्शन करणारा आहे. या धनशक्तीच्या प्रदर्शनामुळे सामान्य आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या आणि केवळ कर्तृत्वाच्या बळावर राजकारणात येण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांसाठी मनात धडकी भरणारा ठरणार आहे.

Sanjay Gaikwad
BJP Vs Rohit Pawar : धोबीघाट वाटावी, अशी 'बोंबसभा'? रोहित पवारांच्या आमसभेवर भाजपचा निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com