Lohagad Murder Case : भर उन्हात गरम कपडे, लपून छपून डोळ्याने इशारे! केतन अग्रवाल प्रकरणाच्या पोलीस तपासाची ए टू झेड माहिती...

Complete timeline of Lohagad murder case : लोहगड मर्डर प्रकरणात धक्कादायक खुलासे. सिया गर्ल आणि केतन अग्रवाल यांच्याशी संबंधित पोलीस तपास, पुरावे आणि संशयास्पद हालचालींची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Lohagad Murder Case : भर उन्हात गरम कपडे, लपून छपून डोळ्याने इशारे! केतन अग्रवाल प्रकरणाच्या पोलीस तपासाची ए टू झेड माहिती...
Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान तरुण दरीत कोसळल्याची घटना सुरुवातीला एक भीषण अपघात वाटत होती, मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या सखोल तपासात हा धक्कादायक आणि पूर्वनियोजित खून असल्याचा पर्दाफाश झाला आहे.

१८ जून रोजी घडलेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात लोणावळा पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, लोणावळा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संशयाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली आणि या संपूर्ण गुन्ह्याचा 'ए टू झेड' उलगडा केला.

Lohagad Murder Case : भर उन्हात गरम कपडे, लपून छपून डोळ्याने इशारे! केतन अग्रवाल प्रकरणाच्या पोलीस तपासाची ए टू झेड माहिती...
Wedding Card New Rule : राज्य सरकारचा बालविवाह रोखण्यासाठी मोठा निर्णय; लग्नपत्रिकेबाबत नियम अन् अंमलबजावणी ठरणार!

३३ अंश तापमानात 'हुडी' आणि मास्क; पोलिसांना संशय

तपासादरम्यान पोलिसांनी किल्ल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारीक पाहणी केली. १८ जून रोजी तिथले तापमान तब्बल ३३ अंश सेल्सिअस होते. इतक्या कडक उन्हात एक तरुण तोंडाला मास्क, डोक्यावर हुडी आणि कानात मोठे हेडफोन घालून केतन आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल यांचा पाठलाग करताना दिसला. या अस्वाभाविक पेहरावामुळे आणि त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांचा संशय बळावला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तिकीट काउंटर आणि परिसरातील फुटेज तपासले असता, हा हुडी घातलेला तरुण सतत त्यांच्या मागावर असल्याचे स्पष्ट झाले.

डोळ्यांचे इशारे आणि 'साईन लँग्वेज'

फुटेजमध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. केतनचे लक्ष नसताना सियाने मागे वळून पाहिले की तो हुडीवाला तरुण अचानक खाली बसायचा. एका ठिकाणी सिया आणि केतन थांबले असताना, ती केतनची नजर चुकवून त्या तरुणाला डोळ्यांनी आणि हाताने विशिष्ट इशारे (साईन लँग्वेज) करत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. यावरून पोलिसांना या कटात सियाचा थेट सहभाग असल्याचा सुगावा लागला.

तांत्रिक तपास आणि ६ महिन्यांत २००० कॉल्स

पोलिसांनी तांत्रिक तपासाचा आधार घेत सियाच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स आणि डिजिटल डेटाची तपासणी केली. तेव्हा तिचे एका विशिष्ट क्रमांकावर तासनतास बोलणे होत असल्याचे समोर आले. हा क्रमांक तिचा प्रियकर चेतन चौधरी याचा होता. गेल्या वर्षभरात दिवाळीच्या एका पार्टीत या दोघांची ओळख झाली होती आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या अवघ्या ६ महिन्यांत या दोघांमध्ये तब्बल २००० फोन कॉल्स झाले होते.

Lohagad Murder Case : भर उन्हात गरम कपडे, लपून छपून डोळ्याने इशारे! केतन अग्रवाल प्रकरणाच्या पोलीस तपासाची ए टू झेड माहिती...
Ladki Bahin Yojana : नियमबाह्य लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचारी अन् त्या पुरुषांची खैर नाही; जिल्हाधिकाऱ्यांना पैसे वसुलीचे आदेश

असा लागला छडा

प्रेमातील अडसर दूर करण्यासाठीच सिया आणि चेतनने मिळून केतनच्या हत्येचा हा कट रचल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चेतनचे सोशल मीडिया प्रोफाइल्स आणि फोटोंची तुलना सीसीटीव्हीतील हुडी घातलेल्या व्यक्तीशी केली. सर्व तांत्रिक पुरावे जुळल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने चेतन चौधरीला शोधून काढून ताब्यात घेतले, ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा छडा लागला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com