Pune Lok Sabha Election 2024 : धक्का खाण्यापेक्षा टक्का वाढवा, अन्यथा...; महायुतीकडून पदाधिकाऱ्यांना सूचना

lok sabha election 2024 : पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे लोकसभेसाठी सोमवारी मतदान होणार आहे.
ajit pawar eknath shinde devendra fadnavis
ajit pawar eknath shinde devendra fadnavissarkaranma

Pune News : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बारामतीमध्ये ( Baramati ) मतदानाचा टक्का घसरला आहे. विशेष करून बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये ( Baramati Lok Sabha Constituency ) असलेल्या शहरी भागात हा टक्का घटला आहे. याचा फटका काहीसा महायुतीला बसू शकतो, असं जाणकार सांगतात. त्यामुळे बारामतीचा निकाल अगदी काठावर लागू शकतो, असं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवरती महायुतीच्या नेत्यांनी मावळ शिरूर आणि पुण्यामध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचा सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे लोकसभेसाठी ( Pune Lok Sabha Constituency ) सोमवारी मतदान होणार आहे. यावेळी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. प्रशासनासोबतच राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. विशेष करून महायुतीकडून शहरी भागातील मतदानाचा टक्का कसा वाढवता येईल, याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. धक्का खाण्यापेक्षा मतदानाचा टक्का वाढवण्याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामती लोकसभा मतदारसंघातील झालेला मतदानाच्या वेळी पुणे शहरालगत असलेल्या हवेली, कात्रज, खडकवासला, उरळी, फुरसुंगी या परिसरातील मतदानाचा टक्का काहीसा घसरलेला पाहायला मिळाला. शहरी भागातील घसरलेला टक्का हा आपल्या धोक्याची घंटा ठरू शकते, असा काहीसा मतप्रवाह महायुतीच्या गोटात आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघामध्ये येणारा पिंपरी चिंचवडचा शहरी भाग, तसेच शिरूरमध्ये येणारा हडपसर आणि पुण्यालगतचा वाघोलीचा परिसर आणि पुण्यामधील सोसायट्यांमधील मतदारांना जास्तीत जास्त मतदान केंद्रापर्यंत कसं आणता येईल, यासाठीचे विशेष प्रयत्न करण्याचा सूचना पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

वृद्ध मतदारांकडून होणारे मत हे नेहमीच वैचारिक पातळीवर होत असल्याने, असं मत नेहमीच मौल्यवान ठरत आली आहेत. यादृष्टीने असे मतदान वाढविण्यासाठी राजकीय पक्षांनी स्वतःची यंत्रणा तयार केली आहे. तसेच, वृद्ध व दिव्यांग सभासदांसाठी मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी शक्य असल्यास वाहनाची व्यवस्था करणे, दुपारपर्यंत मतदान न केलेल्या सभासदांच्या भेटी घेऊन मतदान करण्याबाबत प्रेरित करावे, यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करावे, अशा सूचनाही देण्यात आली आहेत.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com