Lok Sabha Election 2024 : बारामतीत अजितदादा आणि पवार गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; राजकीय वातावरण तापलं

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीत दोन्ही गटाच्या प्रचारसांगता सभा होणार आहेत.
sharad pawar vs ajit pawar worker baramati
sharad pawar vs ajit pawar worker baramatisarkarnama

Baramati News : बारामतीत ( Baramat Lok Sabha Constituency ) पवार कुटुंब एकमेकांसमोर उभ ठाकलं आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सलग तीनवेळा खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बारामतीत हायव्होल्टेज सामना रंगला आहे. यातच लोकसभेच्या प्रचाराच्या तोफा आज ( 5 मे ) थंडवणार आहेत. आज बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या सांगता सभा होणार आहेत. त्याआधी बारामतीत अजित पवार आणि शरद पवार यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानं बारामतीत दोन्ही पवारांच्या सभा जोरदार होणार आहेत. बारामतीत यंदा दोन राष्ट्रवादी, दोन सभा आणि दोन पवार, असं चित्र पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) विरुद्ध सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) या निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी खरी लढाई ही बारामतीत अजित पवार ( Ajit Pawar ) विरुद्ध शरद पवार ( Sharad Pawar ), अशी होत आहे. सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा ही बारामती मधीन मिशन हायस्कुलच्या मैदानात पार पडत आहे. 50 वर्षांत पहिल्यांदा शरद पवार यांच्या सांगता सभेच मैदान बदललं आहे. दुसरीकडे लेंडी पट्टी येथील मैदानात शरद पवार यांची सभा पडणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यापूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून बारामतीत रॅलीचं आयोजन केलं होतं. तेव्हा, नगरपालिकेसमोर दोन्ही गटाच्या रॅली आमने-सामने आल्या. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ वातावरण तापलं होतं.

sharad pawar vs ajit pawar worker baramati
Sharad Pawar's Interview : अजित पवारांंच्या पोटातलं आता ओठावर येत आहे; शरद पवारांनी ठेवलं मर्मावर बोट

दरम्यान, बारामतीची निवडणूक पहिल्या दिवसापासून रंगतदार होती. आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी घराणेशाहीवर यंदा बारामतीत प्रचार पार पडला. शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे. या निवडणुकीमुळे राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या सभेचं मैदान अजित पवारांनी आधीच सभेसाठी काबीज केलं आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी घेण्यात येत असलेल्या सांगता सभेत शरद पवार नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

sharad pawar vs ajit pawar worker baramati
Sharad Pawar's Interview : भाजपबरोबर गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोबत घेण्याचा विचारसुद्धा करत नाही; पवारांनी ठणकावले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com