Supriya Sule News : होय, आमचं सॉफ्ट लँडिंग… अजित पवार, सुनेत्रा पवार आणि मी तिघेही परिवारवाद!

Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातच लढत होत आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
Sunetra Pawar, Ajit Pawar, Supriya Sule
Sunetra Pawar, Ajit Pawar, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा परिवारवादाचा मुद्दा समोर आला आहे. पंतप्रधान मोदी परिवारवादाचा हा देश तिरस्कार करतो, असं वक्तव्य करत विरोधकांवर निशाणा साधत आहेत. या वक्तव्यावर आता बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज पुण्यामध्ये सभा होत आहे. या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधणार हे निश्चित मानले जात आहे. हा देश परिवारवादाचा तिरस्कार करतो आणि तुमच्या परिवारवादामुळे देशाला वेठीस धरू नका, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने बोलत आहेत. सुप्रिया सुळे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

Sunetra Pawar, Ajit Pawar, Supriya Sule
Sharad Pawar News : "आमच्यावर टीका केल्यानं अंगाला भोकं पडत नाहीत," शरद पवारांनी मोदींना सुनावलं

सुळे म्हणाल्या, अजित पवार (Ajit Pawar) आणि मी परिवारवाद आहोतच. शून्यातून विश्व कोणी निर्माण केलं तर ते शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे अजित पवार आणि मी परिवारवाद असून, आम्हाला सॉफ्ट लँडिंग मिळालेलं आहे.

अजित पवार, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि सुप्रिया सुळे आम्ही तिघेही सॉफ्ट लँडिंग आहोत. आम्ही तिघेही परिवारवाद आहोत. मी हे पार्लमेंटमध्येदेखील बोलले आहे. अजित पवार आणि मी परिवारवाद आहोत, हे नाकारून कसं चालेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल एका मेळाव्यास संबोधित करताना मोठा दावा केला होता. काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्यासोबत 2019 मध्ये शरद पवार यांची बैठक झाली होती. या बैठकीदरम्यान शरद पवार रागावून निघून गेले असल्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे.

अजित पवारांच्या या दाव्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, अशी कोणती बैठक झाली असेल तर प्रत्येक बैठकीला मी उपस्थित नव्हते. मात्र, असं काही घडलं आहे, याबाबत मला तरी आठवत नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

भाजपकडून ए फॉर अमेठी बी फॉर बारामती असा प्रचार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येत आहेत. त्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रत्येकाला प्रचार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते पुण्यात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. अतिथी देवो भवः ही आपली परंपरा राहिली आहे.

(Edited By - Rajanand More)

R

Sunetra Pawar, Ajit Pawar, Supriya Sule
Ajit Pawar On Amol Kolhe : कोरोना संकटातच कोल्हे राजीनामा घेऊन आले होते; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com