Lok Sabha Election 2024 : पुणे लोकसभेच्या प्रचाराचा ठरणार 'रोड मॅप'; कुलकर्णी, मुळीकांच्या भूमिकेकडे लक्ष

Medha Kulkarni, Murlidhar Mohol, Jagdish Mulik : बैठकांत पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा आढावा आणि अंतर्गत हेवे-दावे आणि रुसवे-फुगवे मिटवण्यावर भर असणार
Jagdish Mulik, Murlidhar Mohol, Medha Kulkarni
Jagdish Mulik, Murlidhar Mohol, Medha KulkarniSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : बारामती लोकसभा मतदारसंघाची महायुतीची समन्वय बैठक रविवारी पार पडली. या बैठकीनंतर लगेच उद्या सोमवारी पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील सहयोगी पक्षांची विधानसभा मतदारसंघनिहाय बैठक होणार आहे. यात पुण्यातील 6 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे. या माध्यमातून अंतर्गत हेवे-दावे आणि रुसवे-फुगवे मिटवण्यावर भर देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यासह लोकसभेच्या प्रचाराचा आगामी दोन महिन्यांचा रोड मॅप ठरवण्यात येणार आहे.

Jagdish Mulik, Murlidhar Mohol, Medha Kulkarni
Supriya Sule News : नमो रोजगार मेळाव्यात नोकऱ्या दहा हजार अन् मंडप पाच कोटींचा!

पुणे, बारामती, शिरूर लोकसभा क्लस्टरचे प्रमुख चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) महायुतीतील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांसह बैठक घेणार आहेत. त्यांच्या समवेत आजी-माजी लोकप्रतिनिधींसह शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय माशिलकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे, आरपीआयचे शहर अध्यक्ष संजय सोनावणे, शैलेश चव्हाण, लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संजय आल्हाट, आरपीआयचे (खरात गट) सचिन खरात, शिवसंग्रामचे अध्यक्ष भरत लगड, लहुजी शक्ती सेनेचे विष्णू कसबे यांसह रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना, स्वाभिमान संघटना, भीमसेना, राष्ट्रीय स्वराज्य सेना, लहुजी सेना, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, पीपल्स रिपब्लिक पार्टी (जोगेंद्र कवाडे गट) यांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jagdish Mulik, Murlidhar Mohol, Medha Kulkarni
Pune News: दोन उपमुख्यमंत्र्यांनी दाखवला कात्रजकरांना 'कात्रजचा घाट'; 200 कोटींची घोषणा, आले मात्र 140 कोटीच!

या बैठकीला आजी-माजी आमदार खासदार उपस्थित राहणार असल्याने कोथरूडच्या बैठकीला खासदार मेधा कुलकर्णी आणि वडगाव शेरीच्या बैठकीला माजी आमदार जगदीश मुळीक (Jagdish Mulik) हे देखील बैठकीला उपस्थित राहणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नुकतेच लोकसभेचे उमेदवार असलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी या दोन्ही नेत्यांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर या बैठकींना हे दोन्ही नेते उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे.

Jagdish Mulik, Murlidhar Mohol, Medha Kulkarni
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ठाकरेंना धक्क्यांवर धक्के देणाऱ्या शिंदेंना पुण्यात जोर का झटका?

असे आहे बैठकांचे टाईमटेबल

सोमवार 18 मार्च :

  • सकाळी 10 ते दुपारी 12:30. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची बैठक. सावरकर स्मारक हॉल, विमलाबाई गरवारे शाळे समोर, कर्वे रस्ता.

  • पर्वती विधानसभा मतदारसंघाची बैठक 2 ते 5 या वेळेत संगम सोसायटी, अण्णाभाऊ साठे नाट्यगृहासमोर, स्वामी विवेकानंद पुतळ्याच्या मागे. पुणे-सातारा रस्ता.

  • कोथरूड विधानसभा मतदारसंघाची बैठक सायं 6 ते 8 या वेळेत अंबर हॉल, कर्वे रस्ता, कोथरूड.

मंगळवार 19 मार्च

  • सकाळी 10 वाजता वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाची बैठक, मातोश्री अनुसया सांस्कृतिक भवन, साईबाबा मंदिरापुढे, चंदननगर.

  • दुपारी 2 ते 5 या वेळेत कसबा विधानसभा मतदारसंघाची बैठक- वरदश्री सभागृह, राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या कोपऱ्यावर, नातुबाग, बाजीराव रस्ता.

  • पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाची बैठक सायं 6 ते 8 वाजता, आईमाता मंदिरामागे, यशराज गार्डन समोर, गंगाधाम चौक.

या बैठकांत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराचे नियोजन करण्यात येणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Jagdish Mulik, Murlidhar Mohol, Medha Kulkarni
Maval Lok Sabha Election : बारामतीनंतर मावळात बंडाळी; महायुतीत चाललंय तरी काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com