Shirur Lok Sabha Election 2024 : शिरूरचा उमेदवार ठरेना जाहिरात फलक मात्र सर्वाधिक!

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 32 हजार जाहिरात फलक काढले
banner removed
banner removedsarkarnama
Published on
Updated on

आगामी लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Election 2024 ) आचारसंहिता जाहीर झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनदेखील कामाला लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ( Election Commission ) सूचनेनुसार पुणे जिल्ह्यात समावेश होणाऱ्या पुणे शहर, बारामती, मावळ, आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघातील प्रचार करणारे जाहिरात फलक जिल्हा प्रशासनाने काढण्यास सुरुवात केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा ( Lok Sabha Election ) कार्यक्रम शनिवारी ( 16 मार्च ) जाहीर केला आहे. पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यांत मतदान होणार असून 7 मे ला संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ( Bamarati Lok Sabha Constituency ) मतदान होईल, तर मावळ, शिरूर आणि पुणे शहर या तीन लोकसभा मतदारसंघांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनदेखील सतर्क झाले असून, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

banner removed
Lok Sabha Election 2024 : पुण्यातून दिल्लीत जाण्याची स्वप्नं पाहणाऱ्या 'जय-वीरू'चं काय झालं?

केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालन कठोरपणे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाला दिलेल्या आहेत. त्यानुसार आचारसंहिता लागू झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांतच जिल्ह्यातील शासकीय जागांवरील 11हजार 083, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे 19 हजार 652 तसेच खासगी जागेवरील 10 हजार 815 असे सुमारे 32 हजार 550 जाहिरातीचे फलक, राजकीय पक्षांचे झेंडे आणि भिंतीवर करण्यात आलेले निवडणूक प्रचाराचे लेखन काढून टाकण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या चार लोकसभा मतदारसंघांतील सर्वात जास्त बॅनर्स, जाहिरात फलक हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून काढून टाकण्यात आले आहेत. या मतदारसंघातून सुमारे 16 हजाराहून अधिक जाहिरात फलक काढून टाकण्यात आले आहेत. यामध्ये सरकारी जागेतील पाच हजार 849, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे 10 हजार 388, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे एक हजार 119 बॅनर्स काढण्यात आले, तर पुणे लोकसभा मतदारसंघातील सर्वात कमी जाहिरात फलक काढण्यात आले आहेत.

"निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. निवडणूक पारदर्शक करण्यासाठी ही कारवाई केली जात आहे. जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदारांवर प्रभाव टाकणारे जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, बॅनर्स तसेच विविध राजकीय पक्षांचे झेंडे पूर्णपणे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांतच हे सर्व काम पूर्ण करण्यात येईल," असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना याबाबतच्या सूचना देण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

R

banner removed
Pune Lok Sabha Constituency 2024: चंद्रकांतदादांनी जाहीर केला काँग्रेसचा पुणे लोकसभेचा उमेदवार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com