Ravindra Dhangekar News : गल्लीतून दिल्लीत जाण्याचा रवींद्र धंगेकरांना विश्वास

Pune Lok Sabha Election 2024 : पुण्यात रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ विरुद्ध वसंत मोरे अशी तिरंगी लढत होत आहे.
ravindra dhangekar
ravindra dhangekar sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 13 May : लोकसभेसाठी ( Pune Lok Sabha Election 2024 ) सोमवारी ( 13 मे ) मतदान होत आहे. महाविकास आघाडीचे ( Mahavikas Aghadi ) उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सपत्नीक मतदान केले. त्यांच्या मुलानं देखील पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. पुण्यात रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ ( Murlidhar Mohol ) विरुद्ध वसंत मोरे ( Vasant More ), अशी तिरंगी लढत होत आहे. पण, या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) म्हणाले, "ज्या गल्लीमध्ये मी लहानाचा मोठा झालो, त्या गल्लीमध्येच आज मी लोकसभेचा उमेदवार म्हणून मतदान करत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. याचं गल्लीमधून मी दिल्लीमध्ये जाणार आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आजची निवडणूक खऱ्या अर्थाने पुणेकर जिंकणार आहेत. गेल्या दोन महिन्यांमध्ये पुणेकरांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आहे. काँग्रेसने पुणेकरांचे जनमत घेऊन मला पुणे लोकसभेची उमेदवारी दिली. त्यामुळे मी पुणेकरांचा उमेदवार असून पुणेकर मला नक्कीच निवडून दिल्लीमध्ये पाठवतील," असा विश्वास धंगेकर यांनी व्यक्त केला.

"या गल्लीतून दिल्लीत जाणार असून 'हू इज दिस धंगेकर' या प्रश्नाला भाजप नेते वर्षानुवर्ष उत्तर देणार आहेत," असं धंगेकरांनी म्हटलं.

"प्रचंड प्रमाणात पैसे वाटप करण्यात आलं असून लोकशाहीची दिवसाढवळ्या हत्या होत आहे. त्यामुळे मी लोकशाहीच्या मंदिरामध्ये ठिय्या मांडून न्याय मागितला. मोठ्या प्रमाणात काळा पैसा हा बाहेर निघाला. याचा वापर निवडणुकांमध्ये होत आहे. चुकीच्या पद्धतीने निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तो हाणून पाडण्याचा प्रयत्न मी केला," असं धंगेकरांनी सांगितलं.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com