Shivajirao Adhalrao Patil : एकनाथभाई म्हणतात तसं; म्हणजे कसं, काय आहेत शिरूर-मावळची गणितं?

Shirur Lok Sabha Constituency : पुणे म्हाडाचे सभापती म्हणून पुनर्वसन झाल्यानंतरही आढळरावांनी शिरुर लढण्याची आस सोडली नाही.
Shivajirao Adhalrao Patil
Shivajirao Adhalrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : युतीतील जागावाटप अंतिम टप्प्यात असले तरी अद्याप फायनल झालेले नाही. युतीतील शिरुरचा पेच कायम आहे. ही जागा कोणाकडे जाते त्यावर तेथे युतीचा उमेदवार कोण हे ठरणार आहे. शिवसेनेची ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, त्यांच्याकडे आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या तोडीस तोड असा उमेदवार नसल्याचे राष्ट्रवादी माजी खासदार शिवाजीराव आढळरावांनाच आयात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Shivajirao Adhalrao Patil

पुणे म्हाडाचे सभापती म्हणून पुनर्वसन झाल्यानंतरही आढळरावांनी (Shivajirao Adhalrao Patil) शिरुर लढण्याची आस सोडली नाही. उमेदवारी आणि राष्ट्रवादीकडून लढायचे की कसे याबाबतचा निर्णय आमचे नेते एकनाथभाई शिंदे घेतील. ते म्हणतील तसे होईल, असे स्पष्ट करीत त्यांनी आढळरावांनी हा चेंडू मुख्यमंत्र्यांकडे टोलवला आहे. राज्यात युतीत कोणी किती आणि कुठल्या जागा लढवायच्या हे आज वा उद्या फायनल होईल. त्यावेळी शिरुर कोण लढवणार हे शिंदे ठरवतील, कारण या जागेची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याचे आढळरावांनी स्पष्ट केले.

Shivajirao Adhalrao Patil
Maratha Reservation : हायकोर्टाचा सदावर्तेंना झटका, मराठा आरक्षणाच्या स्थगितीला नकार; न्यायालय नेमकं काय म्हणालं?

शिरुर येथे मीडियाशी बोलताना आपल्याबाबत मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) फायनल निर्णय घेणार असल्याचे आढळरावांनी पुन्हा स्पष्ट केले. शिरुरची जागा एनसीपीला गेली, तर हातावर घड्याळ बांधणार का, या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणतील तसे, असे त्यांनी स्पष्ट केले. १५ वर्षे राष्ट्रवादीला विरोध केल्यानंतर पुन्हा तिकडे प्रवेश केला, तर त्यांचे जुने कार्यकर्ते समजून घेतील का? यावर आढळरावांनी वेळ आहे, उद्या-परवा जागावाटपाचा निर्णय समजेल, असे म्हणत वेळ मारून नेली.

Shivajirao Adhalrao Patil
Pimpari Chinchwad Politics : चंद्रकांत नखातेंनी दुसऱ्यांदा वाढवले आमदार जगतापांचे टेन्शन

कार्यकर्त्यांत अण्णा म्हणून ओळखले जाणारे युतीतील राष्ट्रवादीचे खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील (Dilip Mohite Patil) यांनी आढळरावांच्या शिरुरमधील उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. ती दिली, तर घरी बसेन, असा इशारा देत त्यांचे काम करणार नाही, असे ते म्हणाले आहेत. मावळात युतीकडून स्वत:च आपली उमेदवारी जाहीर केलेले युतीतील राष्ट्रवादीचे आमदार सुनीलअण्णा शेळके यांनी खासदार श्रीरंग बारणेंना केला आहे. ही जागा पक्षाने लढवावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.

दुसरीकडे भाजपच्या मावळ कोअर कमिटीनेही मावळात पक्षाची ताकद शिवसेनेपेक्षा कितीतरी जास्त असल्याने हा मतदारसंघ लढविण्याचा आग्रह केला आहे. मात्र, भाजपच्या ताज्या सर्वेक्षणात बारणे हे निवडून येणार असल्याचे दिसले आहे. जर ते कमळावर लढले, तर डबल लीडने निवडून येऊ शकतात असेही आढळले आहे. त्यामुळे तडजोड म्हणून मावळ पक्षाकडे न घेता बारणेंना कमळावर लढण्यास भाजप सांगू शकते, अशी चर्चा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Shivajirao Adhalrao Patil
Sakal Survey Loksabha 2024 : महायुतीला आशेचा किरण....56 टक्के मतदार म्हणतात 2019 प्रमाणे पुन्हा मतदान करणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com