Sakal Survey Loksabha 2024 : महायुतीला आशेचा किरण....56 टक्के मतदार म्हणतात 2019 प्रमाणे पुन्हा मतदान करणार

Loksabha Election 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरळ लढतीत दोन्ही आघाड्यांमध्ये तुल्यबळ लढत होण्याचा अंदाज 'सकाळ'च्या या सर्व्हेमधून वर्तविण्यात आलेला आहे. मागील निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी महायुतीला एक आशेचा किरण दिसत आहे. पण त्यासाठी महायुतीमधील तीनही पक्षांना आणखी जोर लावावा लागण्याची चिन्हे आहेत.
Sakal Survey-2024
Sakal Survey-2024Sarkarnama
Published on
Updated on

Sakal Survey-2024 News : 'सकाळ माध्यम समूहा'ने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदारांचा कौल घेतला आहे. त्यात केंद्र सरकारच्या तुलनेत राज्य सरकारवर जनतेने नाराजीची भावना बोलून दाखवली आहे. मात्र, आपण मागील २०१९ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच मतदान करणार या प्रश्नाला तब्बल ५६.३ टक्के मतदारांनी होकार दर्शविला आहे.

'सकाळ'च्या सर्व्हेत जवळपास ५० टक्के लोकांनी राज्य सरकारच्या कामावर नापसंती दर्शविली आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या कामावरही सुमारे ४४ टक्के लोकांनी असमाधानी असल्याचे म्हटले आहे. त्याच अनुषंगाने 'सकाळ'च्या सर्व्हेत (Sakal Survey) येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण २०१९ प्रमाणेच मतदान करणार आहात का, असा सवाल विचारण्यात आला हेाता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sakal Survey-2024
Sakal Survey Loksabha 2024 : अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का; शरद पवार गटाला जनतेची पसंती...

त्यावर राज्यातील तब्बल ५६.३ टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले आहे, तर २४.६ टक्के मतदारांनी आपण मागील निवडणुकीप्रमाणे मतदान करणार नाही, असे म्हटले आहे. सांगता येत नाही, असे १२.८ टक्के लोकांनी म्हटले आहे. या वेळी पहिल्यांदाच २.४ टक्के नवमतदार मतदान करणार आहेत.

Sakal Survey
Sakal Survey Sarkarnama

आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक ३३. ६ टक्के लोकांनी मतदानासाठी पसंती दर्शविली आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस पक्षाला १८.५, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला १२. ६ टक्के लोकांनी मतदान करणार असल्याचे म्हटले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला १२.५ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाला ४.९ टक्के, राष्ट्रवादी अजित पवार गटाला ३.९ टक्के, वंचित बहुजन आघाडीला ३.६ टक्के लोकांनी मतदान करणार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १.४ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. इतरांना ५ टक्के, तर अपक्षांना १.१ टक्के मते मिळण्याचा अंदाज 'सकाळ'च्या सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आलेला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या (Mahayuti) सरळ लढतीत दोन्ही आघाड्यांमध्ये तुल्यबळ लढत होण्याचा अंदाज 'सकाळ'च्या या सर्व्हेमधून वर्तविण्यात आलेला आहे. मागील निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी महायुतीला एक आशेचा किरण दिसत आहे. पण त्यासाठी महायुतीमधील तीनही पक्षांना आणखी जोर लावावा लागण्याची चिन्हे आहेत.

R

Sakal Survey-2024
Sakal Election Survey : भाजपला मतदान करायला आवडेल; 'सकाळ'च्या सर्व्हेत लोकांनी थेटच सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com