Lok Sabha Election 2024 : अबब..,पाच हजार कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई, हे आहे कारण..!

Pune district has four Lok Sabha constituencies with 8382 polling stations : जिल्ह्यात पुणे, बारामती, शिरूर, मावळ हे लोकसभेचे चार मतदारसंघ असून त्यामध्ये 8382 मतदान केंद्रे ...
Pune Collector Suhas Diwase
Pune Collector Suhas Diwase Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून बहुतांश लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित झाली आहे. राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतले असून दुसरीकडे जिल्हा प्रशासन देखील निवडणुकीची तयारीत गुंतले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे हे काम पाहत आहेत.

पुणे जिल्ह्यात पुणे शहर, शिरूर, बारामती, (Baramati) मावळ या चार लोकसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या चार लोकसभा मतदारसंघात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 7 मे रोजी बारामती मतदारसंघासाठी तर उर्वरित तीन मतदानसंघाचे मतदान 13 मे रोजी होणार आहे. या मतदारसंघामध्ये मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विविध सरकारी कार्यालयाचील कर्मचारी, अधिकारी यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या चार लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामकाजासाठी एकूण 71 हजार कर्मचारी आवश्यक आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pune Collector Suhas Diwase
Mahavikas Aghadi : सुळे, कोल्हे अन् धंगेकर एकाचवेळी उमेदवारी अर्ज दाखल करणार; पुण्यात महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन!

निवडणुकीच्या कामासाठीची जबाबदारी देण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघानुसार सध्या हे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणांना आतापर्यंत पाच हजार कर्मचारी गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिलेल्या या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ज्या कर्मचारी, अधिकारी यांना निवडणुकीचे काम दिले जाणार आहे, त्याची यादी जिल्हा प्रशासनाने तयार करून यापूर्वीच संबधितांना याबाबतचे आदेश देण्यात आले होते.

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. राज्यात पाच टप्प्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्हा आकाराने मोठा आहे. पुणे जिल्ह्यात समावेश होत असलेल्या बारामती, मावळ,(Maval) शिरूर तसेच पुणे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये 8 हजार 382 मतदान केंद्र आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी मोठी यंत्रणा उभारण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. निवडणुकीच्या कामासाठी तब्बल ७१ हजार अधिकारी, कर्मचारी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना वेगवेगळ्या स्तरावर प्रशिक्षण दिले जात आहे.

Pune Collector Suhas Diwase
Baramati Politics : बारामतीत 'पवार पाॅवर'; अजितदादांनी तळ ठोकला तर शरद पवारही मैदानात...

या प्रशिक्षणासाठी सुमारे दहा टक्के कर्मचारी गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली आहे. काही कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजाचे दोन आदेश मिळाले असल्याने काही कर्मचाऱ्यांनी एकदा प्रशिक्षण घेतले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबतची आवश्यक ती शहानिशा करून उर्वरित गैरहजार कर्मचाऱ्यांना नोटीस काढण्यात येणार आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी (Collector) डॉ. दिवसे यांनी सांगितले. निवडणुकीचे काम करणे आवश्यक आहे. महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदारसंघात निवडणूक कामकाज देण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच एका महिलेसोबत दुसरी महिला कर्मचारी जोडीला देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com