Baramati Politics : बारामतीत 'पवार पाॅवर'; अजितदादांनी तळ ठोकला तर शरद पवारही मैदानात...

Lok Sabha Election 2024 : बारामतीकर नेमकं कुणाच्या पाठीमागे ? ते या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.
Baramati Politics
Baramati PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Baramati News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठींवर आणि संपर्क साधण्यावर भर दिला आहे. यावेळची निवडणूक बारामतीत थेट पवार विरुद्ध पवार अशीच होणार आहे. त्यामुळे बारामतीकर नेमकं कुणाच्या पाठीमागे ? ते या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.

Baramati Politics
Baramati Loksabha : 'विजय शिवतारे मागे लागले की 'सळो की पळो' करतात'; अजित पवार नेमकं काय म्हणाले...

अजित पवार यांनी मागील दोन दिवसांपासून बारामतीतच तळ ठोकला आहे. या वेळी त्यांनी विविध लोकांशी संवाद साधला. चर्चा, सभा, मेळावे, भेटींसह डिनर डिप्लोमसीही साधली. तर दुसरीकडे शरद पवार यांनीही विविध मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. मतदारसंघातील विविध घटकांच्या संपर्कावरही त्यांनी भर दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Baramati Politics
Sharad Pawar News : याला म्हणतात 'शरद पवार' पॅटर्न! बारामतीत अजितदादांच्या शिलेदारावरच गळ?

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी 17 दिवस मिळणार आहेत. एवढ्या कालावधीत मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांपर्यंत पोहोचून प्रचार करण्याचे आव्हान सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासमोर असणार आहे. दोन्ही गटांतील किती स्टार प्रचारक या मतदारसंघात येणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, येथील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार व महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या गुरुवारी (ता. 18) पुण्यात आपापला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने पुण्यात दोन्ही बाजूने मोठे शक्तिप्रदर्शन होईल अशी अपेक्षा आहे.

Baramati Politics
Ajit Pawar News: नवी खेळी? बारामती लोकसभेसाठी आता अजित पवारदेखील उमेदवार...

दरम्यान, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा बारामती विधानसभा मतदारसंघाचा प्रचाराचा सुरुवात शुक्रवारी (ता.18) तालुक्यातील श्री क्षेत्र कण्हेरी येथून होणार आहे. पवार कुटुंबीयांच्या प्रत्येक निवडणुकीचा बारामतीतील नारळ श्री क्षेत्र कण्हेरी येथूनच करण्याची परंपरा आहे, सुप्रिया सुळे यांनी यंदाही ही परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com