Amol Kolhe News : 'आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?' करंदी ग्रामस्थांचा कोल्हेंना सवाल; अन् मग...

Amol Kolhe Banner : खेड तालुक्यातील 'त्या' बॅनरनंतर आता 'गावासाठी काय केले,' अशी विचारणा शिरूरमधील करंदी गावातील ग्रामस्थांनी कोल्हेंना केली.
Amol Kolhe
Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Political News : 'अमोलदादा, तब्बल पाच वर्षांनंतर आपले आमच्या गावात सहर्ष स्वागत!' असे उपरोधिक बॅनर शिरूर लोकसभेतील (Shirur Lok Sabha Constituency) आघाडीचे (शरद पवार राष्ट्रवादी) उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्याविरोधात रासे (ता. खेड) या गावात लागल्याचे सोमवारी (15 एप्रिल) समोर आलं होतं. त्यानंतर आता 'आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले,' असा सवाल शिरूर तालुक्यातील करंदी ग्रामस्थांनी मंगळवारी (16 एप्रिल) कोल्हेंना भर प्रचार सभेत केला.

2019 ला खासदार झाल्यावर कोल्हे (Amol Kolhe) मतदारसंघात फिरकलेच नसल्याचा मुद्दा घेऊन त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार महायुतीचे (अजित पवार राष्ट्रवादी) शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalrao Patil) आपल्या प्रचारात त्यावरच अधिक भर देत आहेत. तोच मुद्दा कोल्हेंना अडचणीचा ठरतो आहे.

मतदारसंघातील कधीच न फिरकलेल्या गावात कोल्हेंना त्याबाबत विचारणा होत आहे. त्यातूनच रासेभोसे, चाकण येथील ग्रामस्थांनी 'अमोलदादा, तब्बल पाच वर्षांनंतर आपले आमच्या गावात सहर्ष स्वागत!' असे उपरोधिक बॅनर लावल्याचे दिसले. त्यानंतर आता कोल्हेंना थेट विचारणाच शिरूर तालुक्यात झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हे शिरूर तालुक्याच्या गावभेट मंगळवारी दौऱ्यावर होते. करंदी गावात त्यांचे शाल देऊन स्वागत झाले. त्यावेळी एका गावकऱ्याने व्यासपीठावरच त्यांना 'पाच वर्षे झाली, करंदी गावासाठी काय केले, हे आपण आपल्या भाषणात सांगावे,' अशी आवाहनवजा सूचना केली. त्याला थेट उत्तर न देता, "आपल्या अगोदरच्या खासदारांनी (आढळराव) दहा वर्षांत एक पत्रकार परिषद घेतली नाही," असा आरोप कोल्हेंनी भाषणात केला.

"मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात अनेक वेळा शिरूरमध्ये येऊन गेले. केंद्रीय मंत्रीही येतील,' असे सांगत करंदी गावासाठी 'पाच वर्षांत काय केले," या मूळ प्रश्नाला मात्र कोल्हेंनी खुबीनं बगल दिली.

Amol Kolhe
Amol Kolhe Vs Ajit Pawar : पलटीसम्राट अन्‌ खोके सम्राटपेक्षा नटसम्राट कधीही चांगला; कोल्हेंचा अजितदादांवर प्रतिहल्ला

दरम्यान, अशोक पवार हे शिरूरचे आमदार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात आहेत. त्यांच्याच तालुक्यात कोल्हेंना करंदी ग्रामस्थांनी वरील जाब विचारला. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे या गावाने गतवेळी 2019 ला कोल्हेंना लीड दिले होते.

करंदी व रासेभोसे गावाअगोदर हडपसर विधानसभा मतदारसंघातील वाघोलीकरांनीसुद्धा कोल्हेंविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हेंच्या वक्तृत्वाचा काहीच फायदा आपल्याला झाला नसून, त्यांनी आपल्या कामाचा हिशेब देण्याची मागणी वाघोलीतील वॅको या एनजीओने करीत कोल्हेंना प्रथम अडचणीत आणले होते.

( Edited By : Akshay Sabale )

R

Amol Kolhe
MP Amol Kolhe News : ...अन् खासदार कोल्हेंनी माईकाचा ताबा घेतला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com