Loksabha Election 2024 : 'शिरूर'साठी मुख्यमंत्र्यांच्या आढळरावांना सूचना; म्हणाले, 'तयारीला लागा...'

Allotment of Mahayuti seats in two days : महायुतीचे जागावाटप दोन दिवसांत होणार आहे. यात शिरूरची जागा कोणी लढायची, याचा निर्णय होईल.
Shivajirao Adhalrao Patil, CM Eknath Shinde
Shivajirao Adhalrao Patil, CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिताही लागू झाली. मात्र, शिरूर मतदारसंघाचा प्रश्न अद्याप सुटलेला दिसत नाही. महायुतीने प्रतिष्ठेचा करून ठेवलेल्या या लढतीत ‘शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारीला लागा,’ अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना केली आहे.

शिरूर लोकसभा (Shirur Loksabha) मतदारसंघासाठी इच्छुक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी या जागेबाबत चर्चा झाली. या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढळराव यांना सूचना करताना म्हणाले, ‘महायुतीचे जागावाटप दोन दिवसांत होणार आहे. यात शिरूरची जागा कोणी लढायची, याचा निर्णय होईल. मात्र, तुम्ही निवडणूक लढण्याची तयारी करा. निवडणूक धनुष्यबाणाच्या किंवा घडाळ्याच्या चिन्हावर लढायची, याचा निर्णय दोन दिवसांत जागावाटपात होईल.’ मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या सूचनेवरून शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हेच उमेदवार असतील हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

Shivajirao Adhalrao Patil, CM Eknath Shinde
OBC Reservation News: ओबीसी राजकीय आघाडीची पहिली यादी जाहीर; असा आहे अजेंडा...

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिरूर मतदारसंघासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे हा मतदारसंघ त्यांना गेल्यास आढळराव ‘राष्ट्रवादी’कडून निवडणूक लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. असे असताना जागावाटपात झालेल्या आदलाबदलीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिल्यास आढळरावांना पक्ष बदलण्याची गरज पडणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील निवडणुकीत शिवसेनेकडून उभ्या असलेल्या आढळराव यांचा पराभव राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी केला होता. या वेळी मात्र कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून उमेदवारीचे दावेदार आहेत. त्यांनी तशी तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे शिरूरमध्ये कोल्हे विरुद्ध आढळराव अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे.

R

Shivajirao Adhalrao Patil, CM Eknath Shinde
Madha Lok Sabha 2024: गोरेंसोबत निंबाळकरांच्या नेते अन् कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com