Loksabha Election 2024 : बारामतीतील वाद मुंबईत मिटणार! आजी-माजी आमदारांची नाराजी दूर होणार?

Assembly Elections : विधानसभेचा निर्णय घ्या, तरच आम्ही लोकसभेला काम करू, असा निर्वाणीचा इशाराच महायुतीच्या मित्रपक्षातील आमदार देत आहेत. त्याबाबतचा निर्णय चंद्रकांत पाटील यांनी घेतलेला आहे.
Ajit Pawar, Chandrakant Patil
Ajit Pawar, Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर ठेपल्या असतानादेखील अद्याप भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तितकासा समन्वय पाहावयास मिळत नाही. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मित्र पक्षातील आजी-माजी आमदारदेखील एकमेकांविरोधात दंड थोपटताना दिसत आहेत.

आमच्या विधानसभेचा निर्णय घ्या. तरच आम्ही लोकसभेला काम करू, असा निर्वाणीचा इशाराच महायुतीच्या मित्रपक्षातील आमदार देत आहेत. यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, त्या संदर्भातील बैठक या आठवडाभरातच मुंबई येथे होणार आहे.

पुणे (Pune) जिल्ह्यात येत असलेल्या बारामती - शिरूर आणि पुणे शहर या लोकसभा मतदारसंघांचे प्रमुख म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात महायुतीत सहभागी असलेल्या कोणता पक्षाचा उमेदवार निवडणूक लढू शकेल आणि विजयी होऊ शकेल, यावर चर्चा करण्यासाठी आज चंद्रकांत पाटील यांनी सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत चर्चा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधून लोकसभा मतदारसंघांचा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आढावा घेत वरिष्ठांना अहवाल देणार आहेत.

Ajit Pawar, Chandrakant Patil
Chandrakant Patil On Mahadev Jankar : महायुतीच्या बैठकांना 'रासप'ला निमंत्रण का नाही? पाटील म्हणाले, "जानकर हे..."

पुण्यातील डीपी रस्त्यावरील भाजप (BJP) च्या नवीन पक्ष कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बारामती लोकसभेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बारामती मतदारसंघातील महायुतीतील स्थानिक वाद मिटवण्यासाठी मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) विरुद्ध दत्तात्रय भरणे, विजय शिवतारे विरुद्ध राष्ट्रवादी, राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात यांच्या कार्यकर्त्यांमधील मतभेद मिटवण्यासाठी मुंबईत बैठक घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्याबाबतचा निर्णय या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी घेतलेला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या बैठकीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पुण्यातील बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी तालुका स्तरावरती महायुतीतील पक्षांमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचनादेखील केल्या आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे, असादेखील संदेश या बैठकीच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांनी दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(Edited by Amol Sutar)

R

Ajit Pawar, Chandrakant Patil
Harshvardhan Patil : मित्रपक्ष राष्ट्रवादीकडून धमक्या; घाबरलेल्या हर्षवर्धन पाटलांचे थेट शिंदे-फडणवीसांना पत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com