Sharad Pawar : '...पण मतांची कमतरता पडू दिली नाही', शरद पवारांकडून बळीराजाचे कौतुक

Loksabha Election Result Sharad Pawar farmers : ज्यात सत्तेचा उपयोग तुमचे अडचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी केले जाईल ही स्थिती आपल्याला निर्माण करायची आहे, असे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar
Sharad Pawar sarkarnama

Sharad Pawar News : निवडणूक झाली, तुम्ही काय काम करायचं ते केलं. काही कमतरता पडू दिली नाही. पावसाची कमतरता आहे पण मताची काही कमतरता पडली नाही. चांगल्याप्रकारे तुम्ही तुमचा प्रतिनिधी निवडून दिला, अशा शब्दांत दुष्काळ दौऱ्यावर असलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले.

'निवडणूक होऊन गेली. देशामध्ये सरकार आलं. गेले दहा वर्ष आपण जे बघितलं त्या एका व्यक्तीचे हे सरकार नाही. हे सरकार दुसऱ्याची मदत घेऊन उभे राहिलेले आहे. म्हणून मी म्हणेल मोदींची गॅरंटी आता संपली. ही ताकद तुमच्यात आहे. या देशामध्ये आम्हा लोकांच्या पेक्षा सुद्धा शहाणपणाचा निकाल तुम्ही घेतला.', असे पवार म्हणाले.

शरद पवार Sharad Pawar म्हणाले, माझी खात्री आहे की कालच्या निवडणुकीत जे तुम्ही दाखवलं ते आणखी तीन महिन्यांनी दाखवा. तीन महिन्यांनी दाखवल्यानंतर हे राज्य तुमच्या हातात घ्या. महाराष्ट्राचे राज्य हे आपल्या लोकांच्या हातात येईल आणि त्या राज्यात सत्तेचा उपयोग तुमचे अडचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी केले जाईल ही स्थिती आपल्याला निर्माण करायची आहे, त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ आम्हा लोकांना मिळेल, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो.

Sharad Pawar
Sunil Tatkare : 'अजित पवारांबरोबर जाऊन भाजपने ब्रँड व्हॅल्यू गमावली', सुनिल तटकरेंनी दिलं चोख उत्तर

शरद पवार यांनी पुरंदर तालुक्याच्या कोळविहिरे येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. पुरंदर उपसा योजनेची राहिलेली काम पूर्ण करावीत, अशी काही कामं सुचवली आहेत व ती लेखी दिलेली आहेत. त्यानंतर मी स्वतः, तुमचे आमदार व त्यांचे सहकारी या प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल? यासाठी एकत्र बसू. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन कायम स्वरूपाचे हे प्रश्न कसे सोडवता येतील याबद्दलचा आग्रह त्यांच्याकडे धरून यातून सुटका करण्याची काळजी आम्ही घेऊ, असे आश्वासन पवार यांनी दिले.

Sharad Pawar
Rajya Sabha Seat: राष्ट्रवादीत खलबतं; राज्यसभेसाठी भुजबळ की सिद्दीकी? कोणाची लागणार वर्णी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com