Maval Loksabha : 'विरोधकांकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत', शक्तिप्रदर्शन करत श्रीरंग बारणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Shrirang Barne News : बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
Shrirang Barne  files nomination
Shrirang Barne files nomination sarkarnama

Loksabha News : मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे रिंगणात आहेत. बारणेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत सोमवारी (ता.22) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी प्रचार सोडून त्यासाठी खास उपस्थिती लावली. आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बारणेंनी विरोधकांवर तोफ डागली.

Shrirang Barne  files nomination
Lok Sabha Election 2024 : वंचितने 'मावळ'मध्ये खेळले पुन्हा आगरी कार्ड; दिला घाटाखालचा उमेदवार...

सकाळी थेरगाव येथील निवासस्थानातून अर्ज भरण्यास निघण्यापूर्वी बारणेंनी (Shrirang Barne) उद्धव ठाकरेंच्या राजवटीत विकासासाठी पावले उचलली गेली नसल्याचा आरोप केला. तसेच विरोधकांकडे प्रचाराकरिता विकासाचे मुद्दे नसल्याचेही सांगितले. नंतर विजयरथ असे नाव दिलेल्या वाहनातून त्यांची रॅली निघाली. आकुर्डी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन बारणे मावळच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात गेली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2014,2019 नंतर 2024 असा सलग तिसऱ्यांदा बारणेंनी मावळमधून महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री दीपक केसरकर, विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, विधान परिषद सदस्या उमा खापरे, राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, भाजपच्या चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप आदी उपस्थित होते.

संजोग वाघेरे-पाटील उद्या अर्ज दाखल करणार

बारणेंचे मुख्य प्रतिस्पर्धी आघाडीचे (ठाकरे शिवसेना) उमेदवार संजोग वाघेरे-पाटील उद्या आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. या वेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, उपनेते सचिन अहीर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. वाघेरे हे ही रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

R.

Shrirang Barne  files nomination
Solapur Lok Sabha : प्रणिती शिंदे-राम सातपुतेंसाठी काँग्रेस-भाजपचे सर्वोच्च नेते घेणार सोलापुरात सभा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com