Chinchwad Assembly: चिंचवडच्या विजयाचा महाविकास आघाडीचा निर्धार ; कोल्हे, अहिरांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांची पत्रकार परिषद!

Mahavikas Aghadi Press conference In Chichwad: 'आम्ही एकदिलाने विधानसभा निवडणूकीला सामोरे जाणार आहोत.' असं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं आहे!
MVA Press
MVA PressSarkarnama
Published on
Updated on

PCMC News: आगामी विधानसभा निवडणूकीला गट-तट, नाराजी विसरून महाविकास आघाडी एकदिलाने सामोरे जाऊन तीनही जागांवर विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार केल्याची माहिती पत्रकार परिषदेत शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह घटक पक्षातील नेत्यांनी केला.

पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एकही जागा न मिळाल्याने कार्यकर्त्यांत नाराजी होती. त्या पार्श्वभुमीवर महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस या घटक पक्षातील वरिष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (ता. ३) पिंपरी चिंचवडमध्ये संयुक्त बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या बैठकीनंतर तीनही पक्षातील नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माध्यमाशी संवाद साधत याबाबत माहिती दिली.

MVA Press
Rahul Kalate: शरद पवारांनी आयटी पार्क आणले, पण सत्ताधाऱ्यांनी वाट लावली; राहुल कलाटेंचा घणाघात!

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार सचिन अहिर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, सुलभाताई उबाळे, माजी महापौर संजोग वाघेरे, सुनील गव्हाणे, तुषार कामठे, रवी लांडगे, केसरीनाथ पाटील, तुषार साने, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिंचवडचे उमेदवार राहूल कलाटे, भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणे, पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत, नेताजी काशिद, दत्तात्रय वाघेरे, कल्पना शेटे यांच्यासह व इतर घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरात पक्षाची ताकत असूनही एकाही जागेवर उमेदवारी न मिळाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांत नाराजी होती. त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत नाराजी दूर झाली असून आम्ही एकदिलाने विधानसभा निवडणूकीला सामोरे जाणार आहोत. असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी सांगितलं आहे.

MVA Press
Sharad Pawar Video : आघाडीतील मैत्रीपूर्ण लढतींवर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले...

मी मनापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि विशेषत: सचिन अहिर यांचे आभार मानतो, त्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. त्यांनी आणि सर्व शिवसैनिकांनी आघाडीचा धर्म पाळावा म्हणून विशेष प्रयत्न केले. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकजुटीने आणि एकदिलाने काम करून पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही जागा बहूमताने जिंकतील हा विश्वास आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com