Mahadev Babar - मोठी बातमी! पुण्यात उद्धव ठाकरेंना धक्का; माजी आमदार महादेव बाबर राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Former Hadapsar MLA Mahadev Babar - महादेव बाबर यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे काही माजी नगरसेवकही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार आहेत.
Former Shiv Sena UBT MLA Mahadev Babar seen with Ajit Pawar ahead of officially joining the NCP at a political gathering in Pune.
Former Shiv Sena UBT MLA Mahadev Babar seen with Ajit Pawar ahead of officially joining the NCP at a political gathering in Pune. sarkarnama
Published on
Updated on

Mahadev Babar’s Political Shift: From Shiv Sena (UBT) to NCP -पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कारण, हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. महादेव बाबर यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक निलेश मगर, योगेश सासणे, माजी उपमहापौर बंडू गायकवाड हे देखील आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी हा मोठा धक्क मानला जात आहे. कारण, उपनगरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद म्हणून माजी आमदार महादेव बाबर यांची ओळख होती.मात्र गत विधानसभा निवडणुकीत महादेव बाबर यांना पक्षाने उमेदवारी डावलल्याने ते नाराज होते. विशेष म्हणजे पक्षाच्या अनेक कार्यक्रमांना देखील त्यांनी अनुपस्थिती लावली होती.

विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागल्या असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला पाच माजी नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंतरच्या काळात देखील काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी इतर पक्षांची वाट धरल्याचे पाहायला मिळालं. त्यानंतर आता पक्षाच्या एका माजी आमदाराने उपमुख्यमंत्री अजित पवार नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचं समोर आल आहे.

Former Shiv Sena UBT MLA Mahadev Babar seen with Ajit Pawar ahead of officially joining the NCP at a political gathering in Pune.
Hasan Mushrif on Abu Azmi : ‘’वारी ही वर्षातून एकदा असते, अन् नमाज...’’ ; मुश्रीफांनी आझमींना सुनावलं!

विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आपल्याला हडपसर विधानसभा मतदारसंघाचे तिकीट मिळावं यासाठी महादेव बाबर आग्रही होते. मात्र महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्याने माजी आमदार असलेले महादेव बाबर हे नाराज होत. दरम्यानच्या काळामध्ये महादेव बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेल्या शिवसेनेमध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांची नाराजी दूर करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला.

माजी खासदार विनायक राऊत यांनी महादेव बाबर यांना संपर्क केला होता. या संपर्कादरम्यान बाबर यांना पक्षाचे काम सुरू ठेवण्यास सांगण्यात आलं. तसेच आगामी निवडणुकांसाठी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कामा लागा अडचणीच्या काळात पक्ष सोडून जाऊ नका. अशी गळ घालण्यात आली होती. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तुमची आठवण काढत असून त्यांनी भेटीला बोलावलं असल्याचा निरोप देखील विनायक राऊत यांनी बाबर यांना दिला होता. मात्र त्यानंतर महादेव बाबर यांची भेट उद्धव ठाकरे यांच्याशी झाल्याचं पाहायला मिळालं नाही.

Former Shiv Sena UBT MLA Mahadev Babar seen with Ajit Pawar ahead of officially joining the NCP at a political gathering in Pune.
Kolhapur Politics - कोल्हापूरातही एकनाथ शिंदेंचं 'मिशन टायगर' सुरूच ; आता भाजप अन् ताराराणी आघाडीचे नगरसेवकही गळाला?

मात्र त्यानंतर आता महादेव बाबर हे उद्या(मंगळवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं समोर आलं आहे. महादेव बाबर यांच्यासह माजी नगरसेवक योगेश ससाने आणि निलेश मगर हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. महादेव बाबर यांच्या रूपाने पुणे शहराच्या उपनगरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मोठी ताकद होती मात्र याच ताकतीला कुठेतरी सुरुंग लागला असल्याचं बोलत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com