Sambhajiraje Chhatrapati : "युती-आघाडीची खेळी..."; परिवर्तन महाशक्तीची उमेदवार यादी कधी? संभाजीराजेंनी स्पष्टचं सांगितलं

Sambhajiraje Chhatrapati On Maharashtra Assembly Election : "महाराष्ट्रातील 288 जागांवर उमेदवार द्यावे ही आमची इच्छा आहे. प्रत्येक ठिकाणी चांगला उमेदवार देणे आवश्यक असल्याने ज्या ठिकाणी योग्य उमेदवार मिळेल त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्धार आम्ही केला आहे."
Bacchhu Kadu, Sambhajiraje Chhatrapati, Raju Shetty
Bacchhu Kadu, Sambhajiraje Chhatrapati, Raju ShettySarkarnama
Published on
Updated on

Pune News, 20 Oct : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाची खलबत सुरू आहेत. बहुतांश जागांवर एकमत झालं असलं तरीही काही जणांचा पेच अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे सर्वांना महायुती आणि आघाडीतील मित्र पक्षांच्या उमेदवार याद्यांची प्रतीक्षा आहे.

या याद्यांच्या आधारावरच परिवर्तन महाशक्ती आपली रणनीती ठरवणार असल्याचं संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलं आहे. पुण्यात (Pune) पत्रकार परिषदेत बोलताना संभाजीराजे म्हणाले, "महाराष्ट्रातील आगामी विधानसभा (Assembly Election) निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती मतदारांना चांगला पर्याय देणारं आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून अनेक इच्छुकांचे फोन येत आहेत. अनेक जण भेटी घेत आहेत. मात्र, आम्ही आताच आमची यादी जाहीर करणार नाही. पुढून कशा प्रकारची रणनीती आखली जाते हे पाहूनच आम्ही आमचे उमेदवार निश्चित करणार आहे. आज नांदेडमधील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार साबणेसाहेब हे परिवर्तन महाशक्तीमध्ये प्रवेश करत आहेत.

ते तीन टर्म आमदार राहिले आहेत. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना आम्ही सामावून घेणार असल्याचं यापूर्वीच सांगण्यात आलं आहे. ज्यांच्या अनुभवाचा उपयोग महाराष्ट्र घडवण्यासाठी होईल अशांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी देऊन आगामी विधानसभा लढण्यासाठी तयारी करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील 288 जागांवर उमेदवार द्यावत ही आमची इच्छा आहे. प्रत्येक ठिकाणी चांगला उमेदवार देणे आवश्यक असल्याने ज्या ठिकाणी योग्य उमेदवार मिळेल त्या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. आतापर्यंत 150 जागांवर चर्चा करून परिवर्तन महाशक्तीचं या जागांवर एकमत झाला आहे." अशी माहिती त्यांनी दिली.

Bacchhu Kadu, Sambhajiraje Chhatrapati, Raju Shetty
Manoj Jarange Patil : ज्यांनी मराठ्यांना संपवलं, त्याला संपवायचंच; जरांगेचा एल्गार, कुणाचे उमेदवार पाडणार?

तसंच "आम्ही महायुती (Mahayuti) आणि आघाडीच्या उमेदवारांच्या यादीची वाट पाहत नाही. मात्र ते नेमकी कोणती खेळी करत आहेत. हे बघूनच पुढचं पाऊल उचलणार आहोत. त्यामुळे त्यानंतरच आमच्या उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध होतील. आम्ही आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही आघाडींच्या विरोधात लढत असून त्याचा नेमका कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा हे त्यांनाच ठरवायचं आहे. त्याबाबतचा विचार आम्ही करत नाही" असंही ते म्हणाले.

Bacchhu Kadu, Sambhajiraje Chhatrapati, Raju Shetty
Haryana Election: मोठी बातमी! भाजपची काँग्रेस - 'आप'वर कुरघोडी; 'एवढ्या' उमेदवारांची पहिली यादी जाहीर

परिवर्तन महाशक्तीमधील बच्चू कडू, राजू शेट्टी यासारखे नेते निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे संभाजीराजे देखील निवडणुकीत उतरणार का? याबाबत बोलताना संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले, "मी जर निवडणुकीत उतरलो तर एकाच जागेवर अडकून पडेल त्याचा परिवर्तन महाशक्तीला फटका बसू शकतो त्यामुळे मी लढाईचं का नाही? याबाबतचा विचार सुरू आहे. त्यामुळे योग्य वेळ आल्यानंतर मी लढणार का नाही? हे सांगेन."

जरांगेंशी चर्चा

दरम्यान, यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटलांशी चर्चा झाली असून मी त्यांना विनंती केली आहे की, 'उमेदवार देणं गरजेचं आहे, सोबत या, आपले आमदार म्हणून विधानसभेत गेले तर त्या ठिकाणी आपण आपलं मत ठामपणे मांडू शकतो.' असं माझं मत आहे. त्यामुळे ते काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल, असं संभाजीराजेंनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com