Assembly Election : कोथरुडमध्ये बंडखोरी, अजितदादांनी केली 'या' नेत्याची पक्षातून हकालपट्टी

Assembly Election NCP Vijay Dakale : पुणे शहरामध्ये असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन मतदारसंघ आले. तर भाजपकडे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
Published on
Updated on

Pune News : यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरीचे पीक आल्याचे पाहायला मिळाले. पक्ष नेतृत्वाकडून ही बंडखोरी थोपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले मात्र तरी देखील निवडणूक लढवण्यावरती ठाम असलेल्या बंडोबांवरती कारवाई करण्यास पक्षांनी सुरुवात केली आहे .

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून महायुती आणि भाजपचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत पाटील निवडणूक रिंगणात आहेत. मात्र त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते विजय डाकले यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून विजय डाकले यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

भाजपकडून 40 बंडोखरांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व बंडोखरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपापाठोपात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील बंडोबांना बाहेरचा रस्ता दाखवण्यास सुरुवात केली आहे.

पुणे शहरामध्ये असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन मतदारसंघ आले आहेत. तर भाजपकडे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे.

Ajit Pawar
Devendra Fadnavis : फडणवीस ठाकरेंना म्हणाले, 'शत्रुत्व काढणार असाल तर आमच्यावर काढा,पण...'

दीपक मानकरांकडून कारवाई

डाकले यांच्या हकालपट्टीबाबतचे पत्रक शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी जारी केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीत पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना व मित्र पक्ष, महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत पाटील आहेत. या विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे राहू नये असे वारंवार सांगुनही महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात विजय डाकले निवडणूक लढवत आहेत. ही कृती पक्षशिस्त भंग करणारी आहे. म्हणून डाकले यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.

Ajit Pawar
Vijay Wadettiwar on Bawankule : बावनकुळेंनी राहुल गांधींना नक्षल समर्थक म्हटल्याने वडेट्टीवार संतापले, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com