Pune News : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. या प्रचार सभांच्या माध्यमातून एकामेकांवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे.
निवडणुकीत सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या केंद्रस्थानी लाडकी बहीण ही योजना असल्याचे पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील जाहीर सभेमध्ये याच योजनेच्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. (Devendra Fadnavis News)
पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप (Bjp) उमेदवार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, 'देशातले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला एक मंत्र दिला आहे, देशाचा विकास करायचा असेल तर आपल्या ५० टक्के महिलाना मुख्य प्रवाहात आणावे लागेल. महिलांसाठी अनेक योजना राज्य सरकारने तयार केल्या आहेत. महिलांसाठी एसटीचा प्रवास अर्ध्या पैशात करण्यात आला आहे. सुरुवातीला यामुळे एसटी तोट्यात जाईल, असे काही जण सांगत होते. मात्र, प्रत्यक्षात या योजनेमुळे महिलांचा एसटीने प्रवास करण्याचा कल वाढला असून त्यामुळे एसटी फायद्यात आली आहे.
गरीब कुटुंबातल्या घरामध्ये पैशाच्या अभावामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. मात्र आता शिक्षणासाठी पैसे नसतील तर घाबरू नका मुलीचा मामा मंत्रालयात बसला आहे. तो खर्च उचलेल असे सांगितले जात असल्याचे फडणवीस म्हणाले
लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर विरोधकांनी टीका केली. ही योजना फसवी असल्याचे सांगितले पण आम्ही नोव्हेंबरपर्यंतचे पैसे बहिणींच्या खात्यात टाकले. त्यानंतर देखील काही सावत्र भाऊ हे योजना बंद करायला बघत आहे. ते उच्च न्यायालयात गेले, पण आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि ही योजना बंद होऊ दिली नाही.
उद्धव ठाकरे जाहीर सभेत म्हणाले होते की, आमचं सरकार येऊ द्या मागच्या सगळ्या योजना बंद करतो. परंतु आमची उद्धव ठाकरे यांना विनंती आहे. शत्रुत्व काढणार असाल तर आमच्यावर काढा. आमच्या लाडक्या बहिणीवर काढू नका, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.