Narendra Modi News :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याती स.पा.महाविद्यालयाच्या मैदानावर आपली जाहीर सभा घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्याचे गुणगाण केले. पुण्याने नेहमीच भाजपला पाठींबा दिला आहे. भाजप आणि पुण्याचे नाते हे विचार, संस्कार आणि आस्थेचे नाते आहे, असे मोदी म्हणाले.
'पुण्याने भाजपच्या विचार आणि व्हिजन भरपूर समर्थन केले. मी आभारी आहे. महायुतीचे येणारे सरकार हे पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी वेगाने काम करेल. येणारी पाच वर्ष पुण्याच्या विकासाची नवीन उड्डाण घेईल. पुण्यातील लोकांना सशक्त बनवण्यासाठी इव्हेंसमेंट, इन्फास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रीची गरज आहे. आम्ही याच्या प्रत्येक पैलूवर काम केले', असा दावा देखील मोदींनी केला.
परदेशी गुंतवणूक सर्वाधिक महाराष्ट्रात होत आहे. या गुंतवणुकीमध्ये पुण्याला मोठा वाटा मिळतो आहे. येथील कंपन्यांची संख्या वाढली. कंपन्यांचा विस्तार झाला आहे. स्टार्टअपसाठी लाभ झाला आहे. रोजगाराची संधी निर्माण झाली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
पुण्यात मेट्रो विस्तार होत आहे. मेट्रो सुरू झाली आहे. स्वारगेट कात्रज मार्गावर काम होत आहे, असे देखील मोदींनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसने 60 वर्ष सत्ता केली. पण सगळीकडे बाबासाहेबांचे संविधान लागू केले नाही. जम्मू-कश्मिरमध्ये बाबासाहेबांचे संविधान लागू केले नाही. 370 कलम हटवले नाही. पण तुमच्या सेवक मोदीने 370 कलम जमिनीत गाठले आणि बाबासाहेबांचे संविधान लागू केले.
काँग्रेसने कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या. मात्र त्या कोणत्याही घोषणा पूर्ण करण्यात आल्या नाहीत. त्या उलट जनतेतकडून पैसे वसुलीचे काम सरकार करत आहे. जनतेला खुलेआम लुटत आहे.कर्नाटकमध्ये जे पैसे लुटले आहे तेच महाराष्ट्रात पाठवून निवडणूक लढवल्या जात असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.