Mumbai Dabbawala Association : मुंबई डबेवाला संघटनेने महायुतीला जाहीर केला पाठिंबा!

Mumbai Dabbawala Support to Mahayuti News : 'डबेवाल्यांचं नाव 'या' माणसांमुळे खराब होतंय.' असंही डबेवाला संघटनेच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे; जाणून घ्या नेमकं कोणाबाबत बोलले आहेत.
Mumbai Dabbawala Support to  Mahayuti
Mumbai Dabbawala Support to MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Dabbawala Sanghatna on Vidhan sabha Election : मुंबई डबेवाला संघटनेने विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे. संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी ही घोषणा केली आहे. 'डबेवाल्यांच्या नावाचा स्वार्थासाठी वापर होतोय, राजकीय पक्षाला पाठिंबा दिला जात आहे. डबेवाला संघटनेचा आजवर कुणाला पाठिंबा नव्हता पण आज आम्ही महायुतीला जाहीर पाठिंबा देत आहोत.' असं त्यांनी सांगितलं आहे.

याशिवाय, 'सुभाष तळेकर नामक व्यक्तीने 2011 साली एक संघटना स्थापन केली, त्यात सगळी मंडळी घरातीलच दाखवले आहेत. हा माणूस आधी राष्ट्रवादीत(NCP) होता, डबेवाल्यांचं नाव या माणसांमुळे खराब होतंय. तळेकर आणि डबेवाला यांचा काहीही संबंध नाही. तळेकर वर यापूर्वी गुन्हे देखील नोंद झालेली आहे. कोविडमध्ये देखील असाच फ्रॉड त्याने केलेला आहे. डबेवाल्यांशी त्यांचा काहीही संबंध नाही.' असंही उल्हास मुके यांनी म्हटलं आहे.

याचबरोबर '2018 मध्ये त्यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. श्रीकांत भारतीय यांनी आमच्यासाठी मोठी मदत केली आहे. मुंबई डबेवाला संघटनेचा महायुतीला पाठिंबा जाहीर करत आहोत.' अशी घोषणा केली.

Mumbai Dabbawala Support to  Mahayuti
PM Narendra Modi : जनता ‘चेले चपाटे’ घरी पाठवणार! पंतप्रधान मोदींचा कुणावर निशाणा?

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाचं संकल्पपत्र प्रकाशित करण्यात आलं. या संकल्पपत्रात कोणत्या योजनांचा समावेश असणार याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Mumbai Dabbawala Support to  Mahayuti
PM Modi in Pune : '...त्यामुळे रोड शो दरम्यान काळजी घ्यावी' ; शरद पवारांच्या 'या' आमदाराचा पुण्यात येणाऱ्या मोदींना सल्ला!

महायुतीचं (Mahayuti) सरकार सत्तेवर आल्यास लाडक्या बहि‍णींना पंधराशे ऐवजी महिन्याला 2100 रुपये देणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केली. तसंच यावेळी त्यांनी राज्यात 25 लाख रोजगार निर्मिती करणार असंही आश्वासन दिलं आहे. याशिवाय त्यांनी आम्ही शेतकरी, महिला आणि युवांना डोळ्यांसमोर ठेवून योजना जाहीर केल्याचं सांगितलं होतं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com