Revanth Reddy : मोदी महिलांच्या किचनमधून पैसे चोरी करतात; मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भाजपला सुनावलं

Telangana CM Revanth Reddy slams BJP over economic policies: तेलंगणात काँग्रेस राबवत असलेल्या योजनांवर अपप्रचार करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी चांगलेच सुनावले.
Revanth Reddy
Revanth Reddy Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप महायुतीकडून काँग्रेस खोटी आश्वासन देत असल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे.

काँग्रेस शासित राज्यामध्ये जी आश्वासन काँग्रेसने दिली होती, ती पूर्ण केली नसल्याचा आरोप देखील महायुतीचे नेते करताना दिसत आहे. या आरोपांना काँग्रेसचे तेलंगणातील मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जोरदार उत्तर दिले.

पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रेवंत रेड्डी म्हणाले, "महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका सुरू असताना भाजप (BJP) मैदान सोडून पळत आहे. महाराष्ट्रातील निवडणुका सोडून पंतप्रधान परदेशात फिरत आहेत". आम्ही जाहीर केलेल्या सगळ्या गॅरंटी आमच्या सरकारने अकरा महिन्यात पूर्ण केल्या आहेत. आमची गॅरंटी भाजपसारखी बकवास जुमलेबाजीची गॅरंटी नाही, असेही रेड्डी म्हणाले.

Revanth Reddy
Amol Kolhe : 'हो मी बारामतीत जाणार, दादांच्या विरोधात सभा घेणार'; कोल्हेंचा फडणवीसांवर देखील पटलवार

काँग्रेसने (Congress) तेलंगाणामध्ये दिलेली आश्वासन पूर्ण केली नाही, असा आरोप करण्यात येत आहे. त्यावर रेड्डी म्हणाले, "तुमच्या हिंमत असेल तर संसद भवनातून कोणी मंत्री तेलंगणाला आजच पाठवा, तुमच्याकडे जर तिकडे यायला पैसे नसतील, तर मी विमान पाठवतो. दिल्लीत असाल, तर तिकडे पाठवतो. मुंबईत असाल, तर मुंबईत पाठवतो. पण या". शेतकऱ्याला आम्ही आश्र्वासित केले होते की दोन लाख माफ होतील. सरकार स्थापन झाल्यानंतर 25 दिवसात 18 हजार करोड रुपये इतकं 23 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफी आम्ही केली आहे. मात्र भाजपकडून याबाबत अपप्रचार सुरू असल्याचे टीका रेड्डी यांनी केली.

Revanth Reddy
Ajit Pawar : अमोल कोल्हेंना स्वाभिमानाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? अजितदादांनी इतिहासच काढला

रेड्डी पुढे म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण या नेत्यांनी गद्दारी करून गुजरातीची गुलामी स्वीकारली आहे. गुजरातचे दोन लोकं मुंबई लुटत आहेत". भाजपसाठी अगोदर अदानी आणि अंबानी होते. आता मात्र आता 'एक है तो सेफ है', अशी घोषणा देत मुंबई अदानी यांच्या घशात घातली जात आहे, असा आरोप केला.

"केंद्र सरकार दरवर्षी दोन करोड नोकऱ्या देणार होते. मात्र सरकारला अकरा वर्षात फक्त साठ लाख नोकऱ्याच देता आल्यात. कर्नाटकात योजनांचा लाभ दिला नाही, असा खोटा प्रचार भाजपकडून करण्यात येत आहे. परंतु हिंमत असेल तर केंद्र सरकारने चौकशी समिती नेमून चौकशी करावी, की कुणाच्या सरकारने किती योजनांचा लाभ दिला आहे. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र महागाई वाढून पंतप्रधान मोदी महिलांच्या किचन मधून ही पैसे चोरी करतात", अशी टीका रेड्डी यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com